दहशतवादी प्रतिबंधक कारवाई, एकाचा जमीन अर्ज तर दोघांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील एका दहशतवादी प्रतिबंधक कारवाईमधील एकाचा जामीन अर्ज तर दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
दहशतवाद पथक मुंबई यांनी तपास करून सोलापूर जिल्ह्यातील तीन आरोपीवर बीएनएसचे कलम ३१६(५), ३१८ (४) इत्यादी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा दाखल असलेल्या आरोपीवर दस्त नोंदणी व धर्मादाय नोंदणीतील तांत्रिक फरकाचा गैरफायदा घेऊन लोकांची व शासनाची जाणीवपूर्वक दिशाभूल करून १० कोटी ५० लाखांचा अपहार करून लोकांची फसवणूक केल्याची फिर्याद दहशतवादी विरोधी पथकाने केली होती. सदर आरोपीनी संगणमत करून कट रचून देणगीदार लोक, आयकर विभाग, धर्मादाय विभाग, बँक इतर संस्थांची व शासनाची फसवणूक करून आर्थिक गैरलाभ मिळविला होता.
सदर आरोपी हे एका दहशतवादी संघटनेचे पदाधिकारी असल्याचे व त्यांच्या माध्यमातून संस्था चालवित असल्याचे दिसून आले. त्याच बराेबर सोलापूर जिल्ह्यातील सदरची दहशतवादी संघटना ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेची १२६ कोटी ७ लाख ४१ हजार ४५७ रूपये गोळा केले आहे. सदर संस्थेच्या पदाधिकारी यांचे मोबाईल जप्त केले असता त्यांच्या मोबाईलमध्ये व्हाट्स ग्रुप आढळून आला. त्यात ५० पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिकांचे नंबर मिळाले तर ७२ पेक्षा अधिक नंबर आंतरराष्ट्रीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मिळाले. या प्रकरणात आरोपींनी जामीनसाठी अर्ज दाखल केला होता तर् दोघांनी अटकपूर्वसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होती.
या प्रकरणात सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग रजपूत यांनी सदर तीन जामीन अर्जांना तीव्र विरोध करून सरकार पक्षाचे म्हणणे सदर केले. त्यांनी असा युक्तिवाद केला की, तीन आरोपी हे देशद्रोही असून त्यांनी देश विघातक कृत्य करण्यासाठी सदरचा पैसा लोकांच्या माध्यमातून जमा करून लोकांची व शासनाची फसवणूक केली आहे. सदर आरोपींचा पाकिस्थानच्या नागरिकांच्या संपर्कात असून याचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने त्यांचा जमीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांचा जमीन अर्ज फेटाळून लावला आहे.



