Businessindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून सिव्हिल लाईन्स परिसरात CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पण

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांचा भव्य नागरी सत्कार

 

सोलापूर

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून आणि राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या अत्याधुनिक CCTV कॅमेऱ्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी दत्त मंदिर परिसर, सिव्हिल लाईन्स येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी नुकत्याच राज्यसभा खासदार म्हणून निवड झालेल्या प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांचा परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या वतीने भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

 

 

 

याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक प्रियदर्शन साठे,अक्कलकोट पंचायत समिती सदस्या शितल म्हेत्रे, युवा नेते सुमित पाटील, राजू आलुरे, समर्थ मोटे, संजीवनी गायकवाड, दीपक पाटील, अजिंक्य साठे, सचिन माने, राजू माने, यशवंत सोसायटी, रत्नदीप सोसायटी, शास्त्री सोसायटी, नालंदा सोसायटी, आकांक्षा सोसायटी, उज्वला सोसायटी, ज्ञानदीप सोसायटी, सह्याद्री सोसायटी, पोस्टल कॉलनी, कृषी कॉलनी, विश्राम नगर, व्यंकटेश सोसायटी, या सर्व सोसायटीमधील पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, नागरिकांची सुरक्षा आणि जनहिताच्या विकासकामांना मोठी गती मिळत आहे.

 

 

त्यांच्या विशेष निधीतून सिव्हिल लाईन्स परिसरासाठी CCTV कॅमेऱ्यांचा निधी मंजूर झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा आधार मिळणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. संसदेत राज्यसभा सदस्य म्हणून सोलापूरच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळविणे, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, नागरिकांची सुरक्षा आणि नागरी विकासाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करणे, हे आपले प्राधान्य राहील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण कटिबद्ध असून, येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणखी अनेक विकासकामे सोलापूरात मार्गी लावली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

 

या परिसरात दोन शाळा आणि एक महाविद्यालय तसेच २१ गृहनिर्माण सोसायट्या असल्याने CCTV यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे. वाहतूक शिस्त, गुन्हेगारीवर नियंत्रण, सार्वजनिक ठिकाणांवरील प्रभावी देखरेख आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. कार्यक्रमास विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, नागरिक, महिला, युवक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button