crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : तपास अधिकारी म.भा.सकळे यांनी साक्ष नोंदीवली:- अँड. उज्वल निकम

 

सोलापूर

:- ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी *जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते* यांच्यासमोर सुरू झाली.

आज रोजी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त म भा सकळे यांनी आपल्या साक्षीत गुन्ह्याचा तपास हा त्यांच्याकडे आला त्यांनी महत्त्वाची साक्षीदार प्रवीण वाडे, विश्वनाथ पारसवार, मतीन शिकलगार, निलेश धाराशिवकर तसेच इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

 

 

 

यातील आरोपी एडवोकेट सुरेश चव्हाण याने दोन पंचांसमक्ष स्वतःहून निवेदन दिले की मयताचे अंगावरील वाटणीस आलेले दोन सोन्याचे चैन ज्या ठिकाणी लपवून ठेवले आहे ते ठिकाण दाखवतो असे निवेदन दिले. त्याप्रमाणे आरोपी सुरेश चव्हाण याने त्याच्या राहत्या घरातील कपाटातून दोन सोन्याच्या साखळ्या काढून दिल्या त्या जप्त करून त्याचा पंचनामा केला.

तसेच मयताचे व त्याच्या आईवडिलांचे डी एन ए सँपल तपासणीसाठी पाठवले व त्याचा अहवाल प्राप्त केला.

तसेच आरोपींन विरुद्धच्या इतर गुन्ह्यांची माहिती घेतली व केलेल्या तपासाचे कागदपत्रे दोषारोप पत्रकात समाविष्ट करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली.

त्यावर आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासास साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली.

तर खटल्यास 11/12/2026 ही तारीख नेमली.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 एडवोकेट नागराज शिंदे,नंबर ३ तर्फे अँड जयदिप माने हे काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button