विवाह ” बदलते काळ, बदलते स्वरूप…
कौस्तुभ ब्राम्हण वधू-वर अंकाचे प्रकाशन.

सोलापूर :
मानवी संस्कृतीला स्थैर्य, शिस्त आणि संस्कार देणारी विश्वसनीय विवाह संस्था कौस्तुभ ब्राह्मण वधू-वर मंडळाच्या वतीने सुमारे 700 वधू-वर नांव नोंदविलेल्या अंकाचे प्रकाशन व प्रबोधन शनिवार दि ५ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय संकुलातील ” लोकमान्य टिळक सभागृहात सोहळा संपन्न होणार आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यीक, कवी, वक्ते विजय कुवळेकर यांचे हस्ते अंकाचे प्रकाशन व “विवाह : बदलते काळ, बदलते स्वरूप ” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन होणार असून या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूणे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विजय कुवळेकर हे महाराष्ट्राच्या पत्रकारीता आणि साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू नेतृत्व असून गेली पन्नास वर्षे आपल्या लेखणीतून, वक्तृत्वातून ते समाजप्रबोधन करतात. ते महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाचे माजी राज्य माहिती आयुक्त होते.

पत्रकारीतेच्या प्रदीर्घ कारकीर्दीत झी मराठी वृत्तवाहीनी, झी मराठी दिशा तसेच महाराष्ट्रातील सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत या दैनिकात मुख्य संपादक, सल्लागार समितीवर महत्वाची भूमिका बजावत केवळ पत्रकार नव्हे एक संवेदनशील साहित्यीक म्हणून ओळख असून ” आचार्य अत्रे ” प्रकाश चित्रपट : कुरुक्षेत्र : आव्हान या सारख्या गाजलेल्या कांदबऱ्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडे वाचकांची मने जिंकली तांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पत्रकारीता पुरस्कार * मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते : जिवनगौरव : पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या वधू वर केन्द्रांची स्थापना कै हरिभाऊ नाशिककर यांनी केली आता रविन्द्र नाशिककर हे आधुनिक काळा प्रमाणे अंकाचे प्रकाशन व प्रबोधन करत सकाळाचे माजी संपादक अभय दिवाणजी, ज्येष्ठ साहित्यिक श्रुतीश्री वडगबाळकर, रा स्व संघाचे कै आनंद कुलकर्णी तसेच संतोष कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी, जनता बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे, प्रसिद्ध उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, माजी सरकारी वकिल ॲड प्रदिपसिंग रजपुत, महाराष्ट्राचे थोर आदरणीय निरूपणकार व भागवताचार्य विवेक घळसासी, करकंबचे ह भ प श्रीकांन्त महाराज आरोळे मान्यवरांनी आपले विचार मांडले.

बदलत्या काळात विवाह संस्थेसमोरील आव्हाने आणि पालक व तरुणांची भूमिका यावर ” विजय कुवळेकर ” यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरणार आहे. या कार्यक्रमात सोलापूर समाज भूषण पुरस्कार श्रीकांन्त कुलकर्णी व अँड जे जे कुलकर्णी यांना सन्मानीत करणार असून , हा कार्यक्रम सर्वासाठी खुला व विनामुल्य असून सर्व धर्माच्या वधू वर सूचक मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार रविंद्र नाशिककर यांनी केले आहे.



