crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

तहसीलदाराच्या बनावट सह्या व जिवे मारण्याची धमकी प्रकरणी कर्मचाऱ्यास जामीन. :- ॲड. शशि कुलकर्णी…

 

सोलापूर

 

येथील रहिवासी व तहसील कार्यालयातील कंत्राटी ऑपरेटर राहुल शांतीकुमार गायकवाड यास सोलापूर येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

याची थोडक्यात हकीकत अशी की, दि. २१/१०/२०२६ रोजी दुपारी तीन वाजता तहसीलदार दक्षिण सोलापूर हे निवडणूक कामकाज करीत असताना राहुल गायकवाड याने त्याठिकाणी जाऊन तहसीलदार यांना बिले काढणेबाबत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तहसीलदार यांच्या बनावट सह्या करून कंत्राटी तत्त्वावर काम केल्याबाबतची देयके मंजूर करून घेऊन शासनाची फसवणूक केली. याबाबत तहसीलदार दक्षिण सोलापूर यांनी स्वतः फिर्याद दाखल केली होती.

 

 

 

 

त्यावरून कंत्राटी ऑपरेटर राहुल गायकवाड यांना दि. २२/१०/२०२६ रोजी सदर बझार पोलीस स्टेशन, यांनी अटक केली होती. त्यामध्ये आरोपीतर्फे युक्तिवाद करताना ॲड. शशी कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला की, आरोपी सन २०१४ पासून सदर कार्यालयात कार्यरत आहे. आरोपीने तहसीलदार यांच्याकडील बिल मागण्याचा प्रश्नच येत नाही, आरोपी कंत्राटी पद्धतीने कामास असल्याने आरोपीस कंत्राटदाराकडून पगार मिळतो.

 

 

 

आरोपी प्रत्यक्ष कार्यालयात काम करीत असल्याने त्यास बनावट देयके करण्याची आवश्यकता असू शकत नाही. त्यामुळे आरोपी विरुद्धचे आरोप प्राथमिकदृष्ट्या सिद्ध होत नाहीत. तसेच आरोपी तपासात सहकार्य करीत आहेत. वरील सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.

सदर कामी आरोपी राहुल गायकवाड तर्फे ॲड. शशि कुलकर्णी, ॲड. प्रसाद अग्निहोत्री,ॲड.वैष्णवी घनाते, ॲड.आनंद अंत्रोळीकर आणि सरकारतर्फे ॲड.दत्ता पवार यांनी काम पाहिले.

फौजदारी जामीन अर्ज क्र. ११५२/२०२६

कोर्टाचे नाव:- मा. सत्र न्यायाधीश आर. एम. शिंदे साहेब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button