india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात सोलापूर उत्पादन शुल्क विभाग आक्रमक; १०.५८ कोटींचा मुद्देमाल जप्त

गोवा निर्मित विदेशी मद्याची वाहतूक उघड; इचगाव टोलनाक्यावर ६९५ बाटल्यांसह ११.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त...

आयुक्त राज्य उत्पादन शुल्क राजेश देशमुख , विभागीय उपायुक्त सागर धोमकर, यांच्या निर्देशानुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव , सौरभ आदाटे, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १८/११/२०२६ रोजी मंगळवेढा – सोलापूर महामार्गावर , इचगाव टोल नाक्यावर इचगावच्या हद्दीत तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाई मध्ये एकूण विदेशी मद्याच्या २००० मिली च्या ७१ बाटल्या व १३ बॉक्स मध्ये १८० मिली च्या ६२४ बाटल्या असे मिळून ६९५ मद्याच्या बाटल्या , एक चारचाकी कंपनीचे इंट्रा पिकअप वाहन व एक होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

 

तसेच एका इसमावर कारवाई करून ११ लाख २३ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

१ एप्रिल २०२६ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर / अवैध देशी – विदेशी मद्य / परराज्यातील मद्य/ बनावट मद्य निर्मिती / विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत ७१७०८६ ली.रसायन ५१३१३ ली.हातभट्टी दारू ९३४० ब. ली. ताडी , रिकाम्या बाटल्या ३३१४९० , बनावट बुचे १३३१६० , बनावट लेवल १५५४०० व स्पिरीट १३८०० ली. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण १९४१ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.तसेच २०३६ जणांवर कारवाई करून १९५ वाहनासह एकूण रुपये १० कोटी ५८ लाख ३६ हजार ३५९ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

 

 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे , दुय्यम निरीक्षक विकास थोरात जवान आण्णासाहेब कर्चे , नंदकुमार वेळापुरे, आण्णासाहेब फड, पवन उगले, शिवानी मुढे, यांनी पार पाडली आहे. पुढील दुय्यम निरीक्षक एस. डी. कांबळे करीत आहेत.

तसेच अवैध ढाब्यावर मद्य विक्री , अवैध मद्य निर्मिती,वाहतूक ती जवळ बाळगणे यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागा मालक यांनाही या कारवाईत आरोपी करण्यात आले आहे. मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे पुणे येथील दुर्घटनेत लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तरी या विषारी दारूमुळे किडनी निकामी होणे , कायमस्वरूपी अंधत्व येणे, व अकाली मृत्यू असे गंभीर दुष्परिणाम संभवतात. तरी अशा कुठल्याही आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

 

 

 

 

आपल्या परिसरात कोठेही मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास अथवा मिथेनॉल क्लोरेल हायट्रेड इ. तत्सम पदार्थ , द्रव्याची निर्मिती भेसळ वाहतूक , विक्री होत असल्यास त्याची माहिती टोल फ्री क्रमांक १८२३३९९९९ क्रमांक अथवा whatsap क्रमांक ८४२२००११३३ या क्रमांकावर तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button