सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल मैदानात !
विविध प्रवर्गांतून नऊ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल; शिट्टी, कपबशी आणि नारळ चिन्हांची मागणी

सोलापूर
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक मर्यादित, सोलापूरच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. या पॅनलच्या वतीने विविध प्रवर्गांतून नऊ उमेदवारांनी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
माळशिरस अ. विकास सेवा सोसायटीच्या वतीने अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच ब-१ महिला प्रतिनिधी प्रवर्गातून सिंधू सुरेश पाटील व अस्मिता सुरेश गायकवाड, ब-२ अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून दत्तात्रय खडतरे, ब-४ भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातून अनिकेत देशमुख, क कृषी व पणन प्रवर्गातून संग्रामसिंह अजितसिंह जहागिरदार, ड दुग्ध संस्था व व्यक्तिगत भागधारक प्रवर्गातून शिवाजी बलभीम पाटील, तर इ नागरी सहकारी बँका, पतसंस्था, कन्झ्युमर, पाणीपुरवठा, औद्योगिक, विणकर, मजूर व गृहनिर्माण सहकारी संस्था प्रवर्गातून अमोल बाळासाहेब शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शिट्टी, कपबशी आणि नारळ या चिन्हांची मागणी करण्यात आली आहे.



