crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

घेरडी ॲट्रॉसिटी प्रकरणी नऊ जणांची निर्दोष मुक्तता:- ॲड. धनंजय माने…

सोलापूर
दि. १६.११.२०१८ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घेरडी,ता. सांगोला येथे शेत जमिनीच्या बांधाच्या वादावरून फिर्यादीस विळा आणि खुरपी घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून छोटे पीर दस्तगीर पटेल रा. घेरडी, ता. सांगोला याच्यासह नऊ जणां विरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी पंढरपूरच्या विशेष सत्र न्यायालयात होऊन न्यायाधीशांनी सरकार पक्षाचा पुरावा विसंगत पूर्वक असल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

 

 

या खटल्याची हकीकत अशी की, फिर्यादीने खरेदी केलेल्या जमिनीच्या लगत आरोपीची शेतजमीन होती. फिर्यादीच्या ४४ गुंठे जमिनीत आरोपीने अतिक्रमण करून जमीन बळकवली व त्याबाबत सरकारी मोजणी करून घेतली, दगड रोवून तार कंपाऊंड केले परंतु आरोपींनी हद्दीच्या खुणांचे दगड उपटून काढले आणि घटने दिवशी फिर्यादी शेतात गेला असताना आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली व जातीवाचक शिवीगाळ केली असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. याप्रकरणी विभागीय पोलीस अधिकारी यांनी छोटे पीर पटेल ,समीश पटेल, जंगलू पाशा पाटील, मैनुलाल पाटील, मोहसीन पाटील, बिरा निमग्रे, दादासाहेब करंडे, सरुबाई निमग्रे, कमल गरंडे सर्व रा. घेरडी, ता. सांगोला यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते. खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपी छोटे पीर पटेल याचे निधन झाले होते.

 

 

 

सरकार पक्षाचा पुरावा विसंगत पूर्वक आहे त्यामुळे सदर पुराव्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला होता.
याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने ,ॲड. जयदीप माने ,ॲड. सिद्धेश्वर खंडागळे ,ॲड. सुहास कदम, ॲड. वैभव सुतार यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button