Epaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मनीष काळजे यांचे २०२९ साठी रणशिंग; वाढदिवसाला राजकीय शक्तिप्रदर्शन, भावी आमदार म्हणून समर्थकांकडून उल्लेख.!

सोलापूर

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या आदेशामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून माघार घेतलेल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी आता २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याचे संकेत दिले आहेत.११ नोव्हेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शहर मध्य मतदारसंघात ठिकठिकाणी बॅनर लावले. ‘२०२९ ची तयारी ठेवा…आलोच शहर मध्य!’ या संदेशातून त्यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

 

 

सात रस्ता येथे आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणी वेस तालमीचे गामा पैलवान यांची प्रमुख उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. विविध पक्षांतील पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले.

 

 

 

यावेळी उपस्थित काही कार्यकर्त्यांनी मनीष काळजे यांचा उल्लेख भावी आमदार असा केल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपूर्वीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले काळजे हे शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विविध पक्षांतील नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देत त्यांनी शहरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवली आहे.

 

 

 

 

२०२४ मध्ये पक्षाच्या आदेशामुळे निवडणूक न लढवलेल्या काळजे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने २०२९ साठी दिलेले संकेत आणि सात रस्ता येथील उपस्थितीमुळे शहर मध्य मतदारसंघातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. अद्याप निवडणुकीला तीन वर्षांचा अवधी असला, तरी काळजे यांच्या वाढदिवसाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकीय चर्चांना आतापासूनच सुरुवात करून दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button