सुनेच्या आत्महत्या प्रकरणी सासू-सासऱ्याची निर्दोष मुक्तता:- ॲड. शशी कुलकर्णी….

सोलापूर
येथील रहिवासी तानाजी यशवंत माने वय: ७१ व सरूबाई तानाजी माने वय: ६५ या दोघांनी सुनेेस आत्महत्या करणेस प्रवृत्त केल्याप्रकरणीच्या खटल्यातून सोलापूर येथील सत्र न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
याची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक ०४/०२/२०१९ रोजी सून सुप्रिया विजय माने हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याबाबत तिचे वडील बसवराज सदाशिव क्षीरसागर यांनी नवरा, सासू व सासरे यांचे विरुद्ध फिर्याद दाखल केली की, आरोपींच्या छळामुळे सुप्रिया हिने आत्महत्या केली. सदरच्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि कलम ४९८-अ,३०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल होऊन सत्र न्यायालयात खटला दाखल झालेला होता.
त्याप्रमाणे सदर प्रकरणाची सुनावणी होऊन प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले, त्यामध्ये नातेवाईक, डॉक्टर, पंच यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी झाल्या. सरकार पक्षाच्यावतीने आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होत असल्याने आरोपींना कडक शासन होणे बाबत युक्तिवाद केला. त्यावर आरोपींचे वकिल ॲड. शशी कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला की, आरोपी सासू सासरे यांचे मयत सून सुप्रिया हिच्याशी संबंध चांगले होते, हे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले तसेच मयत सुप्रिया हिची सासू सासऱ्यांविरुद्ध कोणतीही तक्रार नव्हती. उलट सासू सासरे मयत सुप्रिया व त्यांच्या मुलांची काळजी घेत होते.या सर्व बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या.न्यायालयाने सदर परिस्थितीचा विचार करून व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सासू सासऱ्यांची निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. प्रसाद अग्निहोत्री,ॲड. आदित्य आदोने, ॲड. रेवती कोरे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. देशपांडे यांनी काम पाहिले.
कोर्ट:- व्हि. एस. मलकलपट्टे- रेड्डी
सत्र खटला क्र.:- १५२/२०१९



