crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

रंगेल प्रेम प्रकरणातून खून : आरोपींची निर्दोष मुक्तता:- ॲड. धनंजय माने…

सोलापूर

 

प्रेम प्रकरणातून रंगेल प्रेयसीच्या आजी प्रियकराकडून माजी प्रियकराचा खून केल्याच्या आरोपावरून कोळा, ता. सांगोला येथील महोदव अलदर सह चौघा आरोपींविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी पंढरपूर सत्र न्यायालयात होऊन न्यायाधीशांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची हकीकत अशी की, आज्जी पद प्राप्त झालेली एक रंगेल महिला मुलगा, सुन व नातवंडांबरोबर गावात राहत होती. तिचे प्रेम संबंध मयत मारुती सायप्पा कोळेकर याच्याबरोबर जमले. त्यानंतर काही महिन्यांनी तिचे प्रेमसंबंध आरोपी महादेव अलदर याच्याबरोबर जुळले. त्यामुळे माजी प्रियकर व आजी प्रियकर यांच्यामध्ये खुन्नस निर्माण झाली. आरोपी महादेव अलदर याने मयत मारुती कोळेकर यास तिचा नाद सोड असा दम दिला तरी देखील मारुती तिच्या मागे लागत होता.

 

 

 

घटनेदिवशी मयत मारुती याचा मृतदेह व त्याची मोटरसायकल सांगोला मिरज रस्त्यावरील माण नदीच्या पात्रात मिळुन आली. मयताच्या भावाने सांगोला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देऊन त्याच्या भावाचा खुन महादेव अलदर, बापु सरगर, तुकाराम सरगर , संजय सरगर यांनी केला असा आरोप केला होता. सदर फिर्यादीचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सातपुते यांनी सर्व आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्रक पाठवले होते.

 

 

आरोपी विरुद्ध सादर करण्यात आलेला परिस्थितीजन्य पुरावा आरोपी विरुद्ध गुन्हा शाबित करण्यास पुरेसा नाही असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. उदय बापु घोंगडे, ॲड. सिद्धेश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम , ॲड. वैभव सुतार यांनी काम पाहिले.
या खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपी महादेव अलदर व आरोपी संजय सरगर यांचे निधन झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button