एम.आय.डी.सी. पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडीसह मोटारसायकल चोरीचे ८ गुन्हे उघडकीस !
सोलापुरात मोटारसायकल चोरांचा पर्दाफाश; ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त...

सोलापूर
एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या प्रभावी तपासामुळे घरफोडीसह मोटारसायकल चोरीचे तब्बल ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून, या प्रकरणी एका विधीसंघर्षित बालकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १४/११/२०२६ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पो.उप.नि. श्री. अरबाज शेख व पथक पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम मोटारसायकल विक्रीसाठी अक्कलकोट रोडवरील बी.एस.एन.एल. टॉवरमागील बाजूस मैदानात पत्राशेडच्या आडोशाला घेऊन येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरीची कबुली देत आपल्या साथीदाराची माहिती दिली.

पुढील तपासात या प्रकरणात एका विधीसंघर्षित बालकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या बालकाकडे अधिक चौकशी केली असता, त्याने विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. या तपासातून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यासह सोलापूर शहरातील इतर पोलीस ठाण्यांतील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड झाले.

उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमाल :
एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे : गु.र.नं. ३८७/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०३(२)) – मोटारसायकल क्र. MH-13-EB-3781 (किंमत ३०,००० रुपये)
एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे : गु.र.नं. ३९१/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०३(२)) – मोटारसायकल क्र. MH-13-AG-6926 (किंमत ३०,००० रुपये)
* एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे : गु.र.नं. ५१८/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०३(२)) – मोटारसायकल क्र. MH-13-IB-7128 (किंमत ४०,००० रुपये)
* एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे : गु.र.नं. ५७६/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०३(२)) – मोटारसायकल क्र. MH-13-DG-5945 (किंमत ४०,००० रुपये)
जोडभावी पेठ पोलीस ठाणे : गु.र.नं. ८५२/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०३(२)) – मोटारसायकल क्र. MH-13-AU-5226 (किंमत २०,००० रुपये)
फौजदार चावडी पोलीस ठाणे : गु.र.नं. ८५६/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०३(२)) – मोटारसायकल क्र. MH-13-DB-6901 (किंमत ६०,००० रुपये)
फौजदार चावडी पोलीस ठाणे : गु.र.नं. ८५६/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०३(२)) – मोटारसायकल क्र. MH-13-BH-6565 (किंमत ७०,००० रुपये)
याशिवाय, दिनांक २०/११/२०२६ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय बातमीच्या आधारे घरफोडीच्या गुन्ह्याचाही छडा लावला. यामध्ये ‘नागोजी बाबा पठाण व सुहास अर्जुन दाना’ यांच्या घरातून चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणी विधीसंघर्षित बालकासह एकूण २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ/मुख्यालय) श्री. गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त (विभाग-१) श्री. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सचिन यादव, पो.उप.नि. अरबाज शेख आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी केली आहे.



