सरकारी कामामध्ये अडथळा आणल्या प्रकरणी माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्यासह 45 जणांची निर्दोष मुक्तता:- ॲड.मिलिंद थोबडे…

खटला 14 वर्षानी निकाली
सोलापूर.
– सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्या प्रकरणे माजी नगरसेवक नागेश गायकवाड रा. सोलापूर यांच्यासह 45 जणांवर भरलेल्या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओमशंकर पाटील यांच्यासमोर होऊन त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की, माजी नगरसेवक नागेश गायकवाड हा नगरसेवक म्हणून कार्यरत असताना उत्पन्नाच्या आधारे शिधापत्रिका वेगळी करण्याची प्रक्रिया ही परिमंडळ अधिकारी विभाग ड येथे सुरू होती. सदर विभागामध्ये सेटलमेंट, रामवाडी, लिमयेवाडी, सलगर वस्ती वगैरेचा परिसर येत होता. त्यावेळी माजी नगरसेवक नागेश गायकवाड हा त्याच्या कार्यकर्ते सोबत परिमंडळ कार्यालयात जाऊन तुम्ही आमच्या भागातील लोकांचे शिधापत्रिका देताना कोणतीही त्रुटी काढायची नाही, कोणतेही कागदपत्रे बघायचे नाही, असे अरेरावीची भाषा वापरून वेळोवेळी धमकावत होता. दिनांक 8/7/2011 रोजी सकाळी साडेअकरा वाजता परिमंडळ विभागातील कर्मचारी त्यांचे कामकाज करीत असताना नागेश गायकवाड व त्याचे कार्यकर्ते व काही स्त्री कार्यकर्ते हे अरेरावीची भाषा करत शिवीगाळ करीत परिमंडळ अधिकारी रोहन मसु भोसले यांच्या तोंडात शाई ओतून पाजू लागले तसेच टेबलावरील कागदपत्रे ही अस्ताव्यस्त फेकली. तसेच सदर घटना घडते वेळेस घटनेचे चित्रीकरण देखील इन चॅनल ने केले होते. सदर घटने बाबत परिमंडळ अधिकारी मोहन मसू भोसले यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती .
पोलिसांनी तपास करून सन 2011मध्ये आरोपी विरुद्ध दोषारोप पत्रका सह चित्रीकरणाची सीडी देखील न्यायालयात दाखल केली होती.
खटल्यात सरकार तर्फे एकंदर 11 साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या युक्तिवादाच्या वेळेस आरोपीचे वकील ऍड मिलिंद थोबडे यांनी इन चैनलने चित्रीकरण केलेली सीडी ही भारतीय पुरावा कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे जप्त करण्यात आलेली नाही. तसेच तपासिक अंमलदाराने सदर घटनेच्या चित्रीकरनाची सीडी ही संबंधित कार्यालयातून जप्त केली नसल्याने तो पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपींना सदर खटल्यात न्याय मिळण्यास तब्बल 14 वर्षाचा कालावधी लागला.
यात आरोपीतर्फे ॲड.मिलिंद थोबडे, ॲड.राम कदम, ॲड. दत्ता गुंड ॲड.विशाल कांबळे तर सरकार तर्फे ऍड. ए.ए. डोके यांनी काम पाहिले.



