crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी दोन आरोपींना जामीन मंजूर:- ॲड. शशी कुलकर्णी…

सोलापूर –

 

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती प्रकरणात एकूण २० आरोपींनी ३ कोटी ६३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणीच्या खटल्यात 1) बाळासाहेब विलास शिंदे वय- ४३ वर्षे, रा. पंढरपूर २) अंबादास रेवणसिद्ध बुगडे वय-३२ वर्षे, रा. जोडभावी पेठ सोलापूर या दोघांना सोलापूर येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
यात थोडक्यात हकीकत की, बांधकाम कामगारांच्या मुलासाठी असलेल्या विविध शैक्षणिक योजनांसाठी बनावट बोनाफाईड शैक्षणिक कागदपत्रे सादर करून शासनाची एकूण रक्कम रुपये 3 कोटी 63 लाख 20 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने दि. ०4/03/2026 रोजीच्या फिर्यादी नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 250/2026 अन्वये फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे नोंदवणी अधिकारी, दुकान निरीक्षक तसेच कामगार कल्याण केंद्र येथे काम करणारे इतर कंत्राटी कर्मचारी आणि दलाल अशा एकूण 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी बाळासाहेब शिंदे व अंबादास बुगडे यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली होती. सदर आरोपींनी ॲड. शशि कुलकर्णी यांचे मार्फत सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन त्यामध्ये असा युक्तिवाद केला कि, प्रकरणात तपास पूर्ण झालेला आहे.

आरोपी ७ महिन्यापासून कारागृहामध्ये आहे, आरोपीचे पुर्वचारित्र गुन्हेगारी स्वरूपाचे नाही, आरोपी खटल्यास सामोरे जाण्यास तयार आहे, योग्य व लायक, जामीन देण्यास तयार आहे, त्यामुळे आरोपींची जामिनावर मुक्तता करावी यास सरकार पक्षाने तीव्र विरोध करून आरोपी विरुद्ध पुरावा असल्याचे सांगुन जामीन अर्ज नामंजूर करण्याबाबत विनंती केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून दोन्ही आरोपींचा जमीन अर्ज मंजूर केला.

 

 

सदरकामी आरोपीतर्फे ॲड. शशी कुलकर्णी, ॲड.गुरुदत्त बोरगांवकर, ॲड. प्रसाद अग्निहोत्री, ॲड. रेवती कोरे यांनी काम पहिले.
जामीन अर्ज क्र. ११२३-1124/2026
कोर्ट – अति.सत्र न्यायाधीश डी.एन. सुरवसे सो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button