सोलापूरकरांच्या वतीने आण्णासाहेब बनसोडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा …
निर्मल कुमार फडकुले सभागृहाच्या पटांगणावर सत्कार सोहळ्याचे आयोजन...

सोलापूर
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटी व शैक्षणिक संस्थेच्या प्रशासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड चे विद्यमान आमदार व सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आण्णासाहेब बनसोडे यांची यांची गुरुवार दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी विश्वस्त पदावर निवड झाल्याबद्दल सोलापूरकरांच्या वतीने आण्णासाहेब बनसोडे सत्कार समितीच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार दिनांक २९/११/२०२६ रोजी दुपारी ४ वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे.
या संस्थेची स्थापना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी केली होती. या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समाजातील वंचित घटकांना उच्च शिक्षण मिळावे .त्यांच्यामध्ये शैक्षणिक व सामाजिक जागृती निर्माण व्हावी यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली.या संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आहेत . या समितीत ११ सदस्य कार्यरत आहेत . या सत्कार समारंभास सोलापूर शहर – जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आण्णासाहेब बनसोडे सत्कार समितीचे आनंद चंदनशिवे , दशरथ कसबे यांनी केले आहे.



