india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेच्या नवनिर्वाचित विभागीय अध्यक्षपदी मनीष काळजे तर विभागीय सचिव पदी करण कोळेकर यांची निवड…

सोलापूर

 

शिव परिवहन वाहतूक व कामगार सेना विभागाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस सोलापूर विभागातील प्रत्येक आगारातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
माजी केंद्रीय अर्थमंत्री
आनंदराव अडसूळ तसेच कार्याध्यक्ष सुनील साळवी यांच्या मार्गदर्शक आदेशानुसार एस टी विभागाचे सरचिटणीस संतोष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.शरद काटे आणि सविता पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत सर्वानुमते सोलापूर विभागाच्या नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली.

नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे

सोलापूर विभाग अध्यक्ष :- सोलापूर जिल्हा प्रमुख मनीष काळजे

विभागीय सचिव:- नागनाथ कोळेकर

विभागीय कार्याध्यक्ष :- सतीश पवार पंढरपूर

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या , कामगारांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या हक्कासाठी ही नवनिर्वाचित कार्यकारिणी करून जोमाने कामाला लागेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

 

 

निवड प्रक्रियेनंतर मान्यवरांनी नूतन कार्यकारणीला पुष्पगुच्छ देऊन पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button