युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर:-

सोलापूर
:- निंबर्गी येथील युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवेकानंद पंचाय्या स्वामी रा निंबर्गी ता द सोलापूर जी सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, यातील फिर्यादीची बहीण ही मयत झाली असल्याने तिची मुलगी ही फिर्यादीकडे राहण्यास आली होती. त्यांचे घरासमोर आरोपी विवेकानंदन हा टेलरिंगचे काम करीत होता. आरोपी व मयत युवती हे निंबर्गी येथील बसवेश्वर प्रशालेत शिक्षण घेत होते. आरोपी विवेकानंद हा मयत युवतीस कायम फोनवर मेसेज करून भेटण्यास बोलवत असे. त्यामुळे मयत युवतीही त्याच्या त्रासास कंटाळली होती. घटने दिवशी म्हणजे दिनांक 18.11.2025 रोजी आरोपी देत असलेल्या त्रासाबाबत तिने तिच्या मावशीस सांगितले होते व राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अशा आशयाची फिर्याद मयत युवतीचे मावशीने मंद्रूप पोलीस ठाण्यात दिली होती.
आपणास अटक होऊ नये म्हणून विवेकानंद स्वामी यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळणे करिता अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर आरोपी विवेकानंद स्वामी याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी ॲड रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात, घटनेची फिर्याद ही विचारांती तीन महिन्यानंतर दाखल केली असून आरोपीची पोलीस कोठडीची गरज नसल्याचे युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपी विवेकानंद स्वामी यास अटकपूर्व जामीन मंजूर केला.
*यात आरोपी तर्फे ॲड.रितेश थोबडे ॲड.मनोज गुंडे, ॲड. श्रीशैल रायचूरकर यांनी तर सरकारतर्फे ॲड. एन.बी पाटील यांनी काम पाहिले.*



