बी-२ हटविण्याचा निर्णय सोलापूरच्या अभिमानात मानाचा तुरा; विकासाची धुरा आता आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या हाती- नगरसेवक किसन जाधव
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी माझा संघर्ष कायम; रोजगार, उद्योग व पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य- आमदार देवेंद्र दादा कोठे

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी माझा संघर्ष कायम; रोजगार, उद्योग व पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य- आमदार देवेंद्र दादा कोठे
सोलापूर
शहरातील जुन्या कामगार चाळींवरील बी-२ निर्बंध हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र दादा कोठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ चे भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी आमदार देवेंद्र दादा कोठे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव केला. याप्रसंगी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल, स्वीकृत नगरसेवक मनीष केत, माजी नगरसेवक जगदीश पाटील, लालू खंडेलवाल, समर्थ नरवडे, वसंत हेमगड्डी, फारुख बागवान, सचिन जाधव, माणिक कांबळे तसेच ईच्छा भगवंताची परिवारातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात बी-२ निर्बंध हटविण्याची अधिकृत घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या विशेष सहकार्याने हा निर्णय शक्य झाला.
अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. या निर्णयामुळे बी-२ निर्बंधाखालील कामगार चाळींमधील सुमारे नऊ हजार कुटुंबांना घराचा कायदेशीर मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, खरेदी-विक्री, बँक कर्ज, वारस नोंद, पुनर्विकास व बांधकाम परवानग्यांतील अडचणी दूर होणार आहेत. यावेळी नगरसेवक किसन जाधव म्हणाले, कामगारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी चिकाटी, अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी पाठपुराव्याच्या जोरावर हा ऐतिहासिक निर्णय घडवून आणला.
बी-२ निर्बंध हटविण्याचा निर्णय सोलापूरच्या अभिमानात मानाचा तुरा रोवणारा आहे. आता सोलापूरचा विकास थांबणार नाही, कारण विकासाची धुरा सक्षम नेतृत्वाच्या रूपाने आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी हाती घेतली आहे. अखेर स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांचे स्वप्न आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी पूर्ण केला असे मनोगत यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केलं. सत्काराला उत्तर देताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, बी-२चा प्रश्न हा हजारो कामगार कुटुंबांच्या न्यायाचा आणि हक्काचा विषय होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला.
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी, रोजगारनिर्मिती, आयटी पार्क, उद्योगवाढ, पाणी, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी माझा पाठपुरावा यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील. सोलापूरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. यावेळी उपस्थितांनी बी-२ निर्बंध हटविण्याचा निर्णय हा सोलापूरच्या कामगार वर्गासाठी ऐतिहासिक ठरल्याची भावना व्यक्त करत आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला अधिक वेग मिळेल, असा विश्वास किसन जाधव यांनी व्यक्त केला.



