पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श विचारांचा समाजाने वारसा जपावा – रंजिताताई चाकोते

सोलापूर
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भवानी पेठ घोंगडे वस्ती परिसरातील बिरूलिंगेश्वर धनगर समाज संघटना यांच्या वतीने धार्मिक वातावरणात श्रींची महापूजा आयोजित करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती सौ. रंजिताताई सकलेश चाकोते यांच्या शुभहस्ते महापूजा संपन्न झाली यावेळी बोलताना रंजिताताई चाकोते म्हणाल्या की, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, धर्म, लोककल्याण आणि समाजहित यांचा आदर्श घालून दिला. देशभरातील मंदिरांचे जतन, घाट, विहिरी, धर्मशाळा उभारून त्यांनी जनसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असून समाजाने त्यांच्या विचारांचा वारसा जपून समाजहितासाठी कार्य केले पाहिजे. याप्रसंगी सौ. रंजिताताई चाकोते यांचा सत्कार निलम्मा मंदकल व नागम्मा गंदाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास समाजाचे ज्येष्ठ आधारस्तंभ तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी शरणप्पा डोळे, नरसप्पा मंदकल, युवक नेते विनायक पाटील, गंगाराम डोळे, मुदक्का करली, सुरेश मंदकल, बिपीन भैय्या पाटील, शिवा मंदकल, सिद्राम हळ्ळी, सिद्राम मंदकल, विजय कोळी, लिंगराज मासरेड्डी, अमर गंजेळी, प्रविण डोळे, नवीन गोटीमुकूल, रवि मंदकल, सिद्राम डोळे, अंबादास कडगुड्डा, नागेश गंदाळ, संतोष कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, महाआरती व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने समाजात एकात्मता, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश दिला.



