india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जयंतीनिमित्त ताज सोशल ग्रुप च्या वतीने मोफत ब्लॅंकेट वाटप..!

सोलापूर

दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून नई जिंदगी परिसरातील हॅप्पी फंक्शन हॉल या ठिकाणी ताज सोशल ग्रुपच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 येथील गोरगरीब गरजू नागरिकांना कंबल ( ब्लॅंकेट) वाटप करण्यात आले” दरम्यान सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, नगरसेवक वैभव हत्तुरे, सामाजिक कार्यकर्ते अबूबकर सय्यद, रफीक इनामदार, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांची उपस्थिती होती” यावेळी सदर कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

 

 

यावेळी बोलताना मान्यवरांनी अजितदादांच्या आठवणी संगत अजितदादांचे नेतृत्व, अजितदादांचे कार्य, अजित दादांची प्रेरणा व अजित दादा ची काम करण्याची पद्धत हे आम्ही कधीच विसरणार नसून सुमित्रा वहिनीच्या माध्यमातून नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्याचं काम करू असे यावेळी बोलताना म्हणाले व आलेल्या सर्व गरजू नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, नगरसेवक वैभव हत्तुरे, सामाजिक कार्यकर्ते अबूबकर सय्यद, रफीक इनामदार, यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप करत सामाजिक संदेश दिले” .

 

 

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताज सोशल ग्रुपचे संस्थापक तथा विद्यमान माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान, सामाजिक कार्यकर्ते नौरोद्दिन मुल्ला, आसिफ राजे, जावेद जेडी, एडवोकेट वसीम शेख, रियाज शेख, शफी भाई शेख, सत्तार सय्यद, हैप्पी हॉल चे मालक अशपाक भाई, शाहिद फूप्पा, आबिद सय्यद, रहीम जाबरसाहब, हिदायत पठाण, अल्ताफ बेलीफ, शिकुर मनाजी, अखिल नाईकवाडी, बाबू शेख, गौस तांबोळी, सद्दाम साथी, पटेल साहब, मालदार साहब,कलवल चाचा, पठाण चाचा, यांसह आदींनी परिश्रम घेतले दरम्यान यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले पहा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button