india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपातर्फे ५६ सामाजिक कार्यक्रम उत्साहात

२०५९ रक्तदान, २२४ वृक्षारोपण अन ११५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासोबत भरगच्च कार्यक्रमांचे झाले आयोजन

 

सोलापूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हून अधिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून शहर भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तब्बल २ हजार ५९ रक्तदान, २२४ वृक्षारोपण अन १ हजार १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासोबत बुधवारी शहरात भरगच्च कार्यक्रमांचे झाले आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमांची सुरुवात सकाळी श्री मार्कंडेय मंदिरात महाआरतीने करण्यात आली. यानंतर सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपातर्फे आयोजित तब्बल १० रक्तदान शिबिरांना एकाच वेळी प्रारंभ झाला. १० रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून विक्रमी २ हजार ५९ इतके रक्तदान झाले. यात शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १ हजार १०९ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात ६९५ तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शहरी भागात २५५ इतके रक्तदान झाले. शहरात तीन ठिकाणी झालेल्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात एकूण १ हजार १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

 

 

 

याशिवाय सोलापूर शहरात भाजपातर्फे शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार, हृदयरोग तपासणी शिबिर, भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप, एसटी पास वाटप, खाऊ वाटप, आरोग्य शिबिर, दिव्यांगांना चादर आणि ब्लॅंकेट वाटप, गॅस वाटप, स्वच्छता अभियान, महिलांना लाठीकाठी प्रशिक्षण, रामरक्षा पुस्तक वाटप, जेष्ठ नागरिकांसाठी शुगर आणि बीपी तपासणी शिबिर, दंत तपासणी शिबिर, महाप्रसाद वाटप, शेतकरी महिलांना शेतीपूरक साहित्य वाटप, भारतमाता प्रतिमा वाटप, आयुष्यमान कार्ड वाटप, रेशन कार्ड वाटप, महिलांना तुळशी रोपांचे वितरण, कुष्ठरोग वसाहतीत अन्नदान, रांगोळी स्पर्धा, क्रीडा साहित्य वाटप, वार्ताफलक उद्घाटन, गाईंना चारा वाटप, निबंध स्पर्धा, विविध गुणदर्शन कार्यक्रम, विशेष विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे विविध आरोग्य, क्रीडा, संस्कृती, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते.

 

 

 

 

या सर्व कार्यक्रमांना आमदार देवेंद्र कोठे, आमदार विजयकुमार देशमुख, महापौर विनायक कोंड्याल,
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सुधा अलीमोरे, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल,
विजय चिप्पा, मेघनाथ येमूल, सत्यनारायण गुर्रम, प्रशांत पल्ली, सुनिता कामाठी, रवीसिंग कैय्यावाले, गौतम कसबे, राजू पाटील, बिज्जू प्रधाने, विनोद भोसले, रामचंद्र जन्नू, सिद्धेश्वर कमटम, सारिका खजुरगी, मनिष केत, गुरुशांत धुत्तरगावकर, अंबादास बिंगी, राम तडवळकर, यशवंत पाथरूट, मोनिका कोठे, धनश्री कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, सिद्धार्थ मंजेली, दत्तात्रय बडगु, देविदास बनसोडे, अक्षय अंजीखाने, नागेश सरगम, नागेश खरात, महेश देवकर, अर्जुन जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व नगरसेवक, सर्व मंडल अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button