
सोलापूर : प्रतिनिधी
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने शिवजयंती उत्वाचे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कबड्डी आणि खो-खो या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीचा अंतिम सामना स्वराज्य स्पोर्ट क्लब आणि श्रीकृष्ण संघात झाला.
यामध्ये श्रीकृष्ण संघाने स्वराज्य संघावर मात केली.खोखोचा अंतिम सामना दमाणी प्रशाला आणि स्वामी विवेकानंद प्रशाला यांच्यात झाला.यामध्ये स्वामी विवेकानंद प्रशालेने विजय मिळवला.
रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी डाळींबी आड मैदान येथे दिवसभर रंगलेल्या या स्पर्धांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपांत्य फेऱ्यांपर्यंत अतिशय चुरशीचे सामने पाहायला मिळाले. कब्बडी स्पर्धाही तीन वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला. एमजी स्पोर्ट्स, विघ्नहर्ता स्पोर्ट्स, सुभाष तरुण मंडळ, अंजुमन क्रीडा मंडळ, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, ईगल स्पोर्ट्स क्लब, एकता स्पोर्ट्स क्लब, कृष्णा स्पोर्ट्स क्लब, जय भवानी स्पोर्ट्स क्लब, श्रीराम स्पोर्ट्स क्लब, माता स्वरूप राणे स्पोर्ट्स क्लब आदी संघांनी दमदार खेळ सादर केला. अंतिम सामना स्वराज्य स्पोर्ट्स क्लब आणि कृष्णा स्पोर्ट्स क्लब यांच्यात प्रथम स समान गुण मिळाल्याने सामना टाय झाला.
प्रत्येक संघाला पाच चढाई करण्यास वेळ देण्यात आला. यामध्ये कृष्णा स्पोर्ट्स क्लब जादा गुण मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.खो-खो स्पर्धेत देखिल 16 सघांनी सहभाग नोंदवला. यामध्ये शरद पवार प्रशाला, दमाणी प्रशाला, व्हॅलेन्टाईन स्कूल, भारती विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, राज मेमोरियल, विष्णुपंत कोठे स्कूल, तसेच ज्ञान ज्योती प्राथमिक प्रशाला यांचा समावेश होता.
अंतिम सामना दमाणी प्रशाला आणि स्वामी विवेकानंद विद्यालय यांच्यात झाला.यामध्ये स्वामी विवेकानंद प्रशालेने बाजी मारली. स्पर्धेचे उद्घाटन भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कब्बडी स्पर्धेसाठी पंच म्हणून विनोद जाधव, संतोष जाधव, स्वाती पुंजाल, योगेश माने, सुवर्णा कांबळे, समीर विजापुरे तर निरीक्षक म्हणून भक्ताज जाधव, खो- खो स्पर्धेसाठी जुबेर शेख, अक्षय पवार, शिवशंकर राठोड, समर्थ मेगे यांनी काम पाहिले.

पारितोषक विततण सोहळ्यास प्रमख पाहुणे म्हणून राजाभाऊ सरवदे, प्रशांत पाटील,दत्ता मुळे, हरीदास जाधव, बाळासाहेब वाघमारे, देवा उघडे, समाधान हावळे,पिंटू डावरे, नाना काळे, जयंवत सलगर, श्रीकांत घाडगे, अजित गायकवाड,राजाभाऊ काकडे उपस्थित होते. सामने यशस्वी करण्यासाठी कब्बडी आणि खो-खो असोशिएशनच्या पदाधिकारी आणि सचिन स्वामी, देविदास घुले , जीवन यादव , सदाशिव पवार यांनी परिश्रम घेतले.



