maharashtrapoliticalsocialsolapur

हर हर महादेव”च्या जयघोषात शिवमय वातावरण — महाशिवरात्रीनिमित्त ईच्छा भगवंताची परिवाराकडून पौष्टिक सुगंधी दुधाचे वाटप: ४० वर्षांची अखंड सेवा…

भक्ती, सेवा आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम म्हणजे महाशिवरात्री-नगरसेवक किसन जाधव

 

सोलापूर

 

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, आध्यात्मिक आणि भक्तिमय पर्व महाशिवरात्री निमित्त ईच्छा भगवंताची परिवार यांच्या वतीने उपवासधारक भाविकांसाठी मसाला दुधाचे भव्य वाटप करण्यात आले. परिवाराचे संस्थापक, मार्गदर्शक व आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर रेल्वे स्थानकासमोर तसेच शहरातील विविध ठिकाणी हा सेवाभावी उपक्रम अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडला पहाटेपासूनच शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये “ॐ नमः शिवाय”चा अखंड जप, रुद्राभिषेक आणि भजन-कीर्तन सुरू होते. भगवान शंकराच्या पिंडीवर बेलपत्र, दूध, दही व मध अर्पण करत भक्तांनी श्रद्धेने अभिषेक केला. दिवसभर उपवास, जप, ध्यान आणि शिवपूजन करून भाविकांनी अध्यात्मिक साधना केली. संपूर्ण परिसर “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
यावेळी प्रभाग क्रमांक २२ चे भाजप नगरसेवक किसन जाधव म्हणाले, “महाशिवरात्री हा भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा पवित्र दिवस आहे.

 

 

 

 

 

या दिवशी उपवास, जप, ध्यान आणि शिवपूजन केल्याने मनःशांती, आध्यात्मिक उन्नती व पापक्षालन होते. शिवभक्तांची सेवा करणे हीच खरी समाजसेवा आहे.” गेल्या ४० वर्षांपासून लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, अँड अनिल जाधव, शिवाजी मामा गायकवाड आणि ईच्छा भगवंताची परिवाराची ही अखंड सेवा साक्षात शिवशंभोच्या नावाने सुरू असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. प्रति वर्षाप्रमाणे यंदा अधिक प्रमाणात तब्बल ७५१ लिटर सुगंधी आणि पौष्टिक दुधाचे वाटप करण्यात आले असून हजारो शिवभक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. उपवासधारक भाविकांची सोय लक्षात घेऊन गरम व पौष्टिक मसाला दुधाचे वितरण करण्यात आले. ही सेवा पुढील काळातही अखंडपणे सुरू राहणार असल्याचा विश्वास नगरसेवक किसन जाधव यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

 

या प्रसंगी पंडित शेटे, अमोल लकडे, सिद्धाराम खजूरगी अध्यक्ष, शरण मठ, नीलम नगर, शिवा बंडगर, अल्ताफ शेख, चेतन नागेश अण्णा गायकवाड, हरीश तेलगू, निलेश कांबळे, विनोद भाऊजी गायकवाड, अँड किरण गायकवाड, कार्तिक जाधव, तन्मेष गायकवाड, तेजस गायकवाड, अजिंक्य जाधव, आदेश जाधव, उमेश जाधव, सागर कांबळे, अमोल जगताप, प्रथमेश पवार, वसंत कांबळे, महादेव राठोड, आकाश जाधव, संकल्प जगदाळे, ऋषी येवले, गणेश यालगी, संतोष हुडको, सचिन आंगडीकर आदी मान्यवर उपस्थित होते. भक्ती, सेवा आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम सोलापूरच्या धार्मिक एकात्मतेचे प्रेरणादायी प्रतीक ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button