maharashtrapoliticalsocialsolapur

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना धर्मांध टिपू सुलतान बरोबर करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना जोडे मारणार:- शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर….

सोलापूर

मुस्लिम मतांच्या दृष्टिकरणासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी धर्मांध टिपू सुलतानची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली आहे अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही :- सभागृहनेते नरेंद्र काळे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन कार्यालयाच्या बाहेर सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आले.

 

 

 

या आंदोलनास शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर,सभागृहनेते नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सरचिटणीस प्रा.नारायण बनसोडे,सुधा अळ्ळीमोरे, साधना संगवे, युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलथे,मंडल अध्यक्ष अक्षय अजिखांने, नागेश सरगम, नगरसेवक रवी कय्यावाले, प्रविण कांबळे आदि उपस्थित होते.

 

सपकाळ यांच्या वक्तव्याला “निंदनीय” आणि “लांगूलचालन” असे म्हणत भाजपच्या शहराध्यक्षा तडवळकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना धर्मांध टिपू सुलतान यांच्या सोबत करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडमारत या हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय खाली मुंडी वर पाय, “छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दुमदुमून गेला होता.

 

 

 

 

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्याचं काम केलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं, मोगलांच्या जोखरातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने सामान्य रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय होते. त्याचवेळी हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करुन दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगूलचालन, जोडे चाटणं मी या जन्मात बघितलेलं नाही”, असा घणाघात सभागृहनेते नरेंद्र काळे केला.

टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे.अशा पद्धतीने जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये थोडी तरी नैतिकता असेल तर काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे असं मत मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी व्यक्त केलं…

 

 

या आंदोलनास नगरसेविका अलका भंवर,भारत बडुरवाले, अनिल कंदलगी, विजय चिप्पा,संतोष कदम,अप्पासाहेब हिपरग्गे,शेखर इगे,रुद्रेश बोरामणी,हेमंत पिंगळे, उमेश कोळेकर, विजया वड्डेपल्ली,धरीराज रमणशेट्टी, प्रविण कांबळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, नगरसेविका,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button