maharashtrapoliticalsocialsolapur

मनपा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर, अंगणवाडी मदतनीसांचे प्रश्न, अतिरिक्त हृदयरोग रुग्णवाहिका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून विधानसभेत आवाज…

प्रश्नांची सोडवणूक करण्याचे मंत्री अदिती तटकरे आणि डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याकडून आश्वासन

 

 

सोलापूर : प्रतिनिधी

मनपा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर, अंगणवाडी मदतनीसांचे प्रश्न, अतिरिक्त हृदयरोग रुग्णवाहिका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी विधानसभेत आवाज उठविला. आमदार देवेंद्र कोठे यांनी मांडलेल्या या प्रश्नांवर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच आरोग्य मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी या प्रश्नांची सोडवणूक करण्याची आश्वासन दिले.

सोलापूर महानगरपालिकेतील विशेष तज्ञ डॉक्टरांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे डॉक्टरांना आणि रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्यात तज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे स्वतः आरोग्य अधिकाऱ्यांना प्रसूती करावी लागली होती, याकडे लक्षवेधत आमदार देवेंद्र कोठे यांनी विशेष तज्ञ डॉक्टरांची मानधन वाढ न रोखता तत्काळ मानधन वाढ करावी अशी आग्रही मागणी केली.

 

 

 

 

सोलापूर शहराच्या चारही बाजूंना विविध तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामुळे सोलापूर शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शासकीय राजशिष्टाचारामुळे अनेकदा शासनाची रुग्णवाहिका वापरात असते. परिणामी त्यावेळेला एखाद्या रुग्णाला रुग्णवाहिकेची गरज भासल्यास आरोग्य विषयक अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त कार्डियाक रुग्णवाहिका मिळावी, अशी मागणीदेखील आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केली.

 

 

 

 

सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या ४ हजार ३०० रुपये ग्रेड पे मिळण्यासाठी चा ठराव मंजूर होऊनदेखील हा विषय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या मागणीची लवकरात लवकर पूर्तता करावी, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली.

अंगणवाडी मदतनीस या पदावरून अंगणवाडी सेविका या पदावर पदोन्नतीने मिळालेल्या कर्मचाऱ्यांना मुख्य सेविका व पर्यवेक्षिका या पदाच्या परीक्षेत बसण्यास परवानगी देण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सभागृहात केली.

 

 

 

 

अंगणवाडी सेविका यांना मुख्य सेविका व पर्यवेक्षिका पदाच्या परीक्षेत बसण्यास शासनाकडून संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु समशिक्षणावर भरती झालेल्या अंगणवाडी मदतनीस मात्र सदरच्या परीक्षेत बसण्यास परवानगी नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे शासनाने त्यांना या पदाच्या परीक्षेत बसण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी सभागृहात केली.

आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरातील विविध समाज घटकांच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडल्यामुळे या प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळाली आहे.
————-
चौकट १

आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागण्यांना दोन्ही मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

आमदार देवेंद्र कोठे यांनी मांडलेल्या अंगणवाडी मदतनीसांच्या प्रश्नावर बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी मदतनीस यांच्या पदोन्नतीबाबत सकारात्मक पावले उचलणार असून अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. तर आरोग्य मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांनी मांडलेला प्रश्न समजून प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे सांगितले.
——-
चौकट २

आमदार देवेंद्र कोठे यांनी मानले तालिका सभापतींचे आभार

पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर बोलण्याची वेळ संपलेली असतानाही आमदार देवेंद्र कोठे यांनी सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रश्नांवर बोलण्याच्या केलेल्या विनंतीला मान देऊन तालिका सभापती समाधान आवताडे यांनी बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia