विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील रात्रीचे वेळी बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणारा सराईत गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद:-शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी…

सोलापूर
दि.25/05/2026 रोजी 20.30 वा. ते दि.26/05/2026 रोजी 05.54 वा. च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने यातील फिर्यादीचे घर नं. ए-97, 98, कल्याण नगर भाग-2, म्हेत्रे टॉवर जवळ, जुळे सोलापूर येथील राहते घराचे सेफ्टी दरवाजाचे व मुख्य दरवाजाचे लॉक तोंडुन घरामध्ये प्रवेश Ûú¹ý®Ö घरातील ²Öê›ü¹ý´Ö¬µÖê असलेल्या लोखंडी कपाटामधील सुमारे 217 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1,20,000/- रु. रोख रक्कम चोरून नेले आहे वगैरे आशयावरुन विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर गु.र.नं. 289/2026, भा.न्या.सं. कलम 331 (3), 331 (4), 305 (a) अन्वये दिनांक 26/05/2026 रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर घरफोडीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तो उघडकीस आणणे बाबत मा. श्री. एम राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ.अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. दिलीप पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या.
वरील नमुद घरफोडी चोरीचा गंभीर गुन्हा घडल्याने नमुद गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नमूद घटनेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील वेगवेगळया ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज, तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करण्याबाबत मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने घटनास्थळी भेट दिली होती. गुन्हयाचे घटनास्थळी सी.सी.टी.व्ही. फुटेज नसल्याने गुन्हा कोणी केला आहे, याबाबत ठोस माहिती मिळत नव्हती. स.पो.नि. शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळापासुन काही अंतरावर घटनास्थळी येण्या-जाण्याच्या मार्गावर असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजची बारकाईने पाहणी करुन संशयिताचे सी.सी.टी.व्ही. फुटेज काढले. नमुद सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसणारे संशयित इसमांबाबत त्यापुढे पोलीस अंमलदार जावेद जमादार, इम्रान जमादार, धिरज सातपुते, उमेश पवार, सुभाष मुंढे, वसिम शेख, काशिनाथ वाघे या पथकाने घटनास्थळापासुन ते सोलापूर-पुणे रोडवरील सुमारे 250 कि.मी. पर्यंत असलेल्या 300 सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची पडताळणी केली. सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याची पडताळणी करुन मिळवलेल्या तसेच तांत्रिक व गोपनिय माहितीचे आधारे आरोपींची ओळख पटवत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की गुन्हयातील आरोपी हा त्याचे हडपसर, पुणे येथील राहते घर परिसरामध्ये आलेला आहे. त्याप्रमाणे वरिष्ठांचे परवानगीने सपोनि शैलेश खेडकर व पथकातील अंमलदार असे हडपसर पुणे येथे जावुन आरोपी नामे – सुरजितसिंग राजपालसिंग टाक, वय 35 वर्षे, रा. सर्व्हे नं. 86, बिराजदार नगर, गल्ली नं. 5, इलेक्ट्रीक डी.पी.समोर, हिंगणे मळा, वैद्युवाडी, हडपसर, पुणे यास त्याचे राहते घर परिसरातुन दि. 20/06/2026 रोजी ताब्यात घेतले.
त्यानंतर गुन्ह्याचे अनुषंगाने अटक आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता आरोपी – सुरजितसिंग राजपालसिंग टाक याने सांगितले की, त्याचा मित्र साथीदार नामे – मंजित कुमार, रा.बरवालिया, तहसील – सलोन, जि.रायबरेली, राज्य उत्तर प्रदेश याच्यासह मिळुन त्यांनी दि. 25/05/2026 रोजी रात्रीच्या सुमारास कल्याण नगर भाग-2, म्हेत्रे टॉवर जवळ, जुळे सोलापूर येथे घरफोडी केली आहे.
सदर आरोपीस विश्वासात घेवुन त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने गुन्हयातील चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यापैकी कांही दागिने इसम नामे – (1) लक्ष्मण गणेश रणशिंगे, वय 27 वर्षे, रा. सर्व्हे नं. 19, गोंधळे नगर, शिवमंदीराजवळ, हडपसर, पुणे, सध्या रा. गल्ली नं. 7, ससाणे नगर, हडपसर, पुणे व (2) संतोष विलास साबळे, वय 29 वर्षे, रा. सर्व्हे नं. 106, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे यांना विकले आहेत. नमुद इसमांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन गुन्हयातील 155 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. त्यांना सदरचे दागिने हे चोरीचे असल्याचे माहित असतानाही विकत घेतल्यामुळे गुन्हयात आरोपी करण्यात आले आहे. तसेच या गुन्हयातील उर्वरीत सोन्याचे दागिने विकत घेणारा सराफ व्यवसायिक नामे – अब्दुल वहिद अब्दुल कादर शेख, वय 45 वर्षे, रा.गाव-मुल्टी,पोस्ट-इटाचुना, तहसील-पांडुआ,जि.हुगली, राज्य-पश्चिम बंगाल 712147 सध्या रा.तम्मण्णा गोल्ड, 795/801, रविवार पेठ, पुणे यास दागिने चोरीचे असल्याचे माहित असुन ते विकत घेतले असल्याने गुन्ह्यात आरोपी करुन अटक करण्यात आली आहे.
अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी गंभीर स्वरूपाची घरफोडी कोणत्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नसताना अथक परिश्रम घेवुन सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रिक माहिती व गोपनिय माहितीच्या आधारे उघडकीस आणली आहे. त्यामध्ये अटक आरोपींकडुन या गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 156.5 ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्हा करण्याकरिता वापरलेले साहित्य असा एकूण 10,63,750/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ.अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री.दिलीप पवार, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, स.पो.नि.शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार जावेद जमादार, विनोद रजपुत, इम्रान जमादार, धिरज सातपुते, उमेश पवार, सुभाष मुंढे, वसिम शेख, काशिनाथ वाघे, आबा सावळे, सैपन सय्यद, विठ्ठल यलमार, राजु मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, अंकुश भोसले, बापू साठे, महेश शिंदे, अनिल जाधव, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश पाटील, व सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतिश काटे, बाळासाहेब काळे, मारुती घोरपडे यांनी केली आहे.



