maharashtrapoliticalsocialsolapur

पत्रकारांचा खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात निषेध; कारवाईची जोरदार मागणी…

 

सोलापूर

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूरातील पत्रकार संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निदर्शने करण्यात आली.

 

 

 

 

यावेळी पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. पत्रकारांबाबत वापरण्यात आलेली भाषा ही अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय असल्याचे आंदोलकांनी म्हटले.आंदोलनादरम्यान पत्रकार प्रतिनिधींनी सांगितले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार हे जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत एका खासदाराने पत्रकारांविषयी अवमानकारक भाषा वापरणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे.

 

पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खासदार संजय दिना पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच भविष्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांचा अवमान होणार नाही यासाठी कठोर भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले.

 

 

 

 

या आंदोलनामुळे पत्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण असून, पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button