india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

 

.

सोलापूर

आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आध्यात्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो भाविक श्रद्धा आणि भक्तीभावाने पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. यंदा आषाढी एकादशी दिनांक २५ जुलै २०२६ रोजी साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने व्यापक प्रवासी सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. आषाढी वारी २०२६ साठी पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर रेल्वे विभागामार्फत एकूण ५४ विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांमुळे भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-

नागपूर – मिरज आषाढी विशेष (४ फेऱ्या)
गाडी क्र. ०१२०५ विशेष नागपूरहून दि. २३ व २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ०८.५० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
पंढरपूर आगमन/प्रस्थान: सकाळी ०८.०० / ०८.२५
गाडी क्र. ०१२०६ विशेष मिरजहून दि. २४ व २५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.५५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
पंढरपूर आगमन/प्रस्थान: दुपारी ०३.५५ / ०५.००

थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहंकाळ, सलगरे आणि अरग.

रचना: २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) – एकूण १८ डबे.

नवीन अमरावती – पंढरपूर आषाढी विशेष (४ फेऱ्या)
गाडी क्र. ०१११९ विशेष नवीन अमरावतीहून दि. २१ व २४ जुलै २०२६ रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
गाडी क्र. ०११२० विशेष पंढरपूरहून दि. २२ व २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता नवीन अमरावती येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)

थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

रचना: २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) – एकूण १८ डबे.

खामगाव – पंढरपूर आषाढी विशेष (४ फेऱ्या)
* गाडी क्र. ०११२१ विशेष खामगावहून दि. २२ व २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
* गाडी क्र. ०११२२ विशेष पंढरपूरहून दि. २३ व २६ जुलै २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजता खामगाव येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)

थांबे: जळंब, नंदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

रचना: २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) – एकूण १८ डबे.

*भुसावळ – पंढरपूर अनारक्षित आषाढी विशेष (४ फेऱ्या)*
* गाडी क्र. ०११५९ विशेष भुसावळहून दि. २४ व २५ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
* गाडी क्र. ०११६० विशेष पंढरपूरहून दि. २५ व २६ जुलै २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १.०० वाजता भुसावळ येथे पोहोचेल.

थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

रचना: १८ सामान्य द्वितीय श्रेणी डबे (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह).

*लातूर – पंढरपूर अनारक्षित आषाढी विशेष (८ फेऱ्या)*
* गाडी क्र. ०११०१ विशेष लातूरहून दि. २४, २७, २८ व २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता सुटेल व त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
* गाडी क्र. ०११०२ विशेष पंढरपूरहून दि. २४, २७, २८ व २९ जुलै २०२६ रोजी दुपारी १.५० वाजता सुटेल व त्याच दिवशी सायंकाळी ७.२० वाजता लातूर येथे पोहोचेल.

थांबे: हरंगुळ, औसा रोड, मुरूड, ढोकी, कळंब रोड, येडशी, धाराशिव, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डुवाडी आणि मोडनिंब.

रचना: ९ शयनयान व ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह).

कोल्हापूर – कुर्डुवाडी दैनंदिन अनारक्षित आषाढी विशेष (१६ फेऱ्या)
गाडी क्र. ०१२०९ विशेष दि. २२ ते २९ जुलै २०२६ दरम्यान दररोज सकाळी ६.१० वाजता कोल्हापूरहून सुटेल व दुपारी १.३० वाजता कुर्डुवाडी येथे पोहोचेल.
पंढरपूर आगमन/प्रस्थान: दुपारी १२.१५ / १२.२५
गाडी क्र. ०१२१० विशेष कुर्डुवाडीहून दररोज सायंकाळी ४.३० वाजता सुटेल व रात्री १०.३० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल.
पंढरपूर आगमन/प्रस्थान: सायंकाळी ०५.३० / ०५.४०

थांबे: हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, अरग, बेलंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढाळगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जवळे, वसूद, सांगोला, पंढरपूर आणि मोडनिंब.

रचना: १४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह).

पुणे – मिरज दैनंदिन अनारक्षित आषाढी विशेष (१६ फेऱ्या)
गाडी क्र. ०१२०७ विशेष दि. २३ ते २९ जुलै २०२६ दरम्यान दररोज सकाळी ८.४० वाजता पुण्याहून सुटेल व सायंकाळी ६.४५ वाजता मिरज येथे पोहोचेल.
पंढरपूर आगमन/प्रस्थान: ०३.५५ / ०४.००
गाडी क्र. ०१२०८ विशेष मिरजहून दररोज सायंकाळी ७.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता पुणे येथे पोहोचेल.
पंढरपूर आगमन/प्रस्थान: ०९.५५ / १०.००

थांबे: हडपसर, उरुळी, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, वासूद, जवळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, लंगरपेठ, कवठेमहांकाळ, सलगरे, बेलंकी आणि अरग.

रचना: १४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह).

आरक्षण व तिकीट बुकिंग
विशेष शुल्कासह चालविण्यात येणाऱ्या आषाढी विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे रेल्वे स्थानकांवरील बुकिंग काउंटर तसेच RailOne अॅपद्वारे उपलब्ध असतील.
प्रवाशांनी वैध तिकिटासह प्रवास करून गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

विशेष गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी किंवा RailOneNTES अॅप डाउनलोड करावे.

भारतीय रेल्वेच्या वतीने भारताच्या समृद्ध आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रवासी-केंद्रित वाहतूक सेवा पुरविण्याच्या बांधिलकीचा हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. सोलापूर विभाग पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत करीत असून, आषाढी वारी २०२६ चा त्यांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आध्यात्मिक समाधान देणारा ठरो, अशा शुभेच्छा व्यक्त करीत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia