स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी ! मालवाहतुक कन्टेनरमधून इलेक्ट्रीकल सामानाची ( Kelvinator AC ) चोरी करणारी टोळी निष्पन्न करुन 28 केलव्हीनेटर कंपनीचे ए.सी. ( Kelvinator AC ) संच जप्त एकूण 10,50,000 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त….

. दिनांक 25/06/2026
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण . अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये मालाविषयी गुन्हयांची उकल करणेकामी व पाहिजे फरारी आरोपी जेरबंद करणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास मालाविषयी गुन्हयांची उकल व पाहिजे फरारी आरोपी जेरबंद करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मालाविषयी गुन्हयाची उकल करणेकामी मोहोळ पोलीस ठाणे येथील शिवाजी चौकातील ब्रिजखाली हजर असताना पथकातील पोलीस अंमलदार मोहन मनसावाले यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, मौजे टाकळी सिकंदर ता. मोहोळ जि. सोलापूर येथील 03 इसम चोरीचे केलव्हीनेटर कंपनीचे ए.सी. ( Kelvinator AC ) संचाची विक्री करण्याकरीता एकत्रित टाकळी सिकंदर येथील कारखाना वसाहत येथील दिपक साळुंके याचे घरासमोरील पत्राशेड समोर उभे असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना कळविले असता, त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांना तात्काळ छापा कारवाई करणेबाबत आदेश दिले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मोहोळ शहरातील शिवाजीचौक येथील ब्रिज खालून बातमी प्रमाणे टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील कारखाना वसाहत येथील दिपक सोळूंके याचे राहते घराजवळ आले असता, तेथे बातमी प्रमाणे 03 इसम उभे असलेले दिसले. त्यांचा सपोनि वाघ यांना बातमी प्रमाणे संशय आल्याने, त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारता ते उडवाउडवीचे उत्तरे देवू लागले, त्यांना सपोनि ज्ञानदेव वाघ यांनी विश्वासात घेवून पोलीस असल्याचे सांगून त्यांना त्यांचे नांव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नांवे 1) दिपक बाबुलाल सोळूंके, वय 47 वर्षे, रा. कारखाना कॉलनी, टाकळी सिकंदर, ता. मोहोळ जि. सोलापूर, 2) शहाजी पठाण गायकवाड, 23 वर्षे, रा. टाकळी सिकंदर ता. मोहोळ जि. सोलापूर, 3) प्रदिप रमेश चिंचकर, वय 26 वर्षे, रा. कारखाना कॉलनी, टाकळी सिकंदर, ता. मोहोळ जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर दिपक सोळूंके याचे घरासमोरील पत्राशेड मध्ये जावून पाहिले असता, मिळालेल्या बातमी प्रमाणे केलव्हीनेटर कंपनीचे ( Kelvinator AC ) 28 ए.सी. संच ठेवलेले दिसले सदर ठिकाणी मिळून आलेल्या केलव्हीनेटर कंपनीचे ए.सी. ( Kelvinator AC ) मालकी हक्काबाबत त्यांचेकडे विचारपूस केले असता, त्यांनी काही एक समाधान उत्तरे दिली नसून ते उडवाउडवीचे उत्तरे देवू लागली. त्यानंतर त्यांचेकडे कौशल्यपूर्ण विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी माहे 30 एप्रिल 2026 ते 01 मे 2026 दरम्यान अहमदनगर सुपा येथून कोची केरळ येथे मालवाहतूक पॅकबंद बॉडी असलेल्या आशर वाहनाच्या चालक याचेबरोबर संगणमत करुन वाहनाचे पाठीमागील सिल तोडून सदर वाहनातील 28 केलव्हीनेटर कंपनीचे ए.सी. ( Kelvinator AC ) आणलेअसून त्याचे कोणतेही मालकी हक्काबाबत योग्य व लायक पुरावे दिले नसल्याने, त्यावरुन त्यांनी सदरचे केलव्हीनेटर कंपनीचे ए.सी. ( Kelvinator AC ) चोरुन किंवा लबाडीने मिळविले असलेबाबत खात्री झाल्याने, त्याबाबत *मोहोळ पोलीस ठाणे येथे गुरनं 629/2026 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 प्रमाणे* गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ/ मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, अक्षय डोंगरे, ज्ञानेश्वर पाथरुट, जगदीश राठोड, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, सतिष बुरकुल यांचे पथकाने कामगिरी बजावली आहे.



