crimemaharashtrapoliticalsocialsolapur

पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता:- अॅड. प्रशांत नवगिरे

 

सोलापूर

सरकारी कामात अडथळा आणून पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील रहिवासी जगन्नाथ गायकवाड (वय २५) यांच्याविरोधात १५ ऑगस्ट २०२० रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हा विनाहेल्मेट व विनामास्क दुचाकी चालवत असताना त्याला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी आरोपीने पोलिसांशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला तसेच पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करून दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

 

 

 

 

सुनावणीदरम्यान आरोपीतर्फे अॅड. प्रशांत नवगिरे यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना सरकारी कामात अडथळा आणल्याचे अथवा पोलिसांवर हल्ला केल्याचे ठोस व विश्वासार्ह पुरावे नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा व साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मनोज शर्मा यांनी आरोपीविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे नमूद केले. तसेच सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने आरोपी जगन्नाथ गायकवाड यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

 

या खटल्यात आरोपीतर्फे अॅड. प्रशांत नवगिरे, अॅड. सिद्धाराम पाटील व अॅड. चेतन राणे यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे अॅड. आनंद कुंडकूर यांनी बाजू मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia