maharashtrapoliticalsocialsolapur

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अभिवादन …

महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिलच्याच्या निवडणुकीत दैदिप्यमान यशाबद्दल ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.मिलिंद थोबडे व मराठी पत्रकार संघटनेच्या शहराध्यक्ष पदी वैभव गंगणे यांची निवड झाल्याबद्दल मध्यवर्ती महामंडळाकडून विशेष सन्मान ...

 

 

 

सोलापूर

 

 

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती मंडळाच्या वतीने शिंदे चौक डाळिंब आड येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, राजश्री शाहू महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी डाळिंब आड परिसर दणाणून सोडला.

 

कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, विधीज्ञ व लोकहिताच्या कार्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. प्रथम महाराष्ट्र राज्य गोवा बार असोशियन निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करणारे विक्रमादित्य
ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा देऊन व लेखक प्रा . अशोक राणा लिखित छत्रपती शिवराय हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

यानंतर अत्यंत अल्प काळात पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल
व मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल वैभव गंगणे यांचाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा देऊन व लेखक प्रा . अशोक राणा लिखित छत्रपती शिवराय हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. विशेष सत्कार करण्यात आला.

 

 

 

आजच्या पिढीने छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे:- वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर

या कार्यक्रमा प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी त्यांच्या भाषणात आजच्या पिढीने छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्यात योगदान दिले पाहिजे . व्यसनापासून लांब राहून राजेंचा विचारांचे समाजात जन प्रबोधन करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे . श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे जयकर यांनी विशेष कौतुक करत सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या..

महाराष्ट्रात वाढलेल्या बलात्कारांच्या घटनांत वाढ :- ॲड.मिलिंद थोबडे

ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.मिलिंद थोबडे यांनी त्यांच्या सत्कारपर भाषणात महाराष्ट्रात अलीकडच्या काळात बलात्कारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .याला पायबंद घालण्यासाठी प्रत्येकाने पुढे सरसावले पाहिजे. खून, हाणामाऱ्या, चोऱ्या , लूटमार, वकील व पत्रकारांवरील वाढते रोखले गेले पाहिजे.यासाठी कायद्याची तरतूद कडक केली पाहिजे. पोलिस प्रशासनाने सतर्कता दाखवली पाहिजे. असे मनोगत व्यक्त केले.

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने केलेल्या सत्कारा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली . व मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्ष पदी वैभव गंगणे यांची निवड झाल्याबद्दल गंगणे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेच्या, शिक्षणप्रसाराच्या आणि बहुजन कल्याणाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमास ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, राजन जाधव,उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर, हेमंत चौधरी, सदाशिव पवार, प्रकाश ननवरे, लिंबाजी जाधव, किरण भंडारी, दादा सुरवसे, संदीप साळुंखे, उज्वलाताई लाळुंखे, लक्ष्मण माळी, सुशील बंदपट्टे , विजय भोसले, दिनेश जाधव, महादेव गवळी, सूर्यकांत पाटील, जगदीश पाटील, ब्रह्मदेव माने मतिन बागवान, श्रीकांत डांगे, दिलीप कोल्हे, शिवाजी वाघमोडे, माऊली पवार, जी. के. देशमुख, संजय जाधव, दिनकर जगदाळे,राम कदम, लहू गायकवाड, महादेव गवळी लता ढेरे, जीवन यादव ,जितू वाडेकर, बिडवे, नितीन मोहिते, देविदास घुले, सचिन स्वामी विजय चव्हाण यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia