crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा करून दमदाटी पोलीसाला मारहाण करणा-या 2 आरोपी यांना मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी शिक्षा सुनावली 

सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

 

दिनांक 26.01.2024 रोजी प्रदीप बनसोडे, पोलीस हवालदार, नेमणुक सोलापूर तालुका, पोलीस ठाणे हे आनंदराव देवकते प्रशाला वडजी ता.द.सोलापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलनच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्ता करीता होते. स्नेहसंमेलन चालु असताना इसम नामे (1)समर्थ जगन्नाथ कवडे हा स्टेजवर नृत्य करीत असलेल्या शाळेच्या विद्यार्थिनीचे अंगावर हिरव्या रंगाची लेजर लाईट मारत असल्याने पोहवा/बनसोडे यांनी त्यांना लेजर लाईट मारू नको सांगितले होते. तेंव्हा इसम नामे (1)समर्थ जगन्नाथ कवडे (2) प्रशांत जगन्नाथ कवडे यांनी पोहवा/बनसोडे यांना आम्ही लेजर लाईट बंद करणार नाही,तु कोण सांगणार, तुला काय करायचे ते कर, मी लेजर लाईट मारणार असे म्हणाले होते तेंव्हा पोहवा/बनसोडे यांनी स्नेहसंमेलनाचे कार्यक्रमात अनुचित प्रकार घडु नये म्हणुन त्यांना बाहेर काढत असताना (1)समर्थ जगन्नाथ कवडे यांनी पोलिस हवालदार बनसोडे यांना दमदाटी करून जोरात ढकलुन दिले. इसम नामे प्रशांत जगन्नाथ कवडे यांने त्याचे हातातील कोणत्यातरी हत्याराने पोहवा/बनसोडे यांचे डाव्या डोळयाचे भुवईवर मारून गंभीर त्यांना जखमी केले होते.

 

 

 

 

 

पोलीस हवालदार प्रदीप बनसोडे हे त्यांचे शासकीय कर्तव्य करीत असताना त्यांना त्यांचे शासकीय कामात वर नमूद दोन इसमांनी अडथळा आणुन दमदाटी करून कोणत्यातरी हत्याराने त्याचे डाव्या डोळयाचे भुवईवर मारून जखमी केले वगैरे मजुकराची पोलीस हवालदार प्रदीप बनसोडे, नेमणुक सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वर नमूद दोन्ही आरोपी विरूध्द भारतीय दंड संहिता कलम 353, 332 प्रमाणे दिनांक 27.01.2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस सहायक निरीक्षक स्वप्नील ईज्जपवार नेमणुक सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी करून गुन्हयातील 2 आरोपी यांचे विरूध्द मा.न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.

 

 

 

दिनांक 31.07.2026 रोजी वर नमूद गुन्हयाची मा.श्री.शर्मा साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांचे न्यायालयात यांचे न्यायालयात सुनावणी झाली आहे.
सुनावणी दरम्यान मा.श्री.शर्मा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांनी आरोपी (1)समर्थ जगन्नाथ कवडे (2) प्रशांत जगन्नाथ कवडे यांना भारतीय दंड संहिता कलम 353 अन्वये दोषी ठरवुन 6 महिन्यांचा सश्रम कारावास व 1000/-रूपये दंड व भारतीय दंड संहिता कलम 332 प्रमाणे 6 महिन्याचा सश्रम कारावास व 1000/-रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्यामध्ये श्री.कुर्डुकर, सहायक सरकारी वकील, सत्र न्यायालय सोलापूर यांनी कामकाज पाहिले आहे. सदरच्या गुन्हयामध्ये दोषसिध्दी होणे करीता सुरज जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर व मा.श्री.कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले आहे.

 

 

 

 

सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन सपोनि/स्वप्नील ईज्जपवार यांनी केला असून त्यांना तपास कामात सपोफौ/विवेक सांजेकर व पोलीस हवालदार श्रीराम आदलिंग यांनी मदत केली आहे. न्यायालयीन कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन श्रे पोलिस उप निरीक्षक विजय जाधव, श्रे पोलिस उप निरीक्षक प्रिया जाधव व कोर्ट पैरवी म्हणुन सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार हणमंत माळी यांनी कामकाज पाहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button