लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टतर्फे अभिवादन…

सोलापूर
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टच्या वतीने भैया चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पद्माकर (नाना) काळे, उत्सवाध्यक्ष जयवंत सलगर आणि उत्सव कार्याध्यक्ष उत्तरा बरडे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी देविदास घुले, मतीनभाई बागवान, श्रीकांत डांगे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, अंबादास शेळके, बजरंग जाधव, प्रकाश ननावरे, मेजर विश्वनाथ गायकवाड, लिंबाजी जाधव, विजय भोईटे, नामदेव पवार, संदीप साळुंखे, नागेश वडणे, सचिन स्वामी, देविदास घुले, बसवराज कोळी, दादा सुरवसे, प्रीतम परदेशी यांच्यासह शिवप्रेमी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि जनजागृतीतील योगदानाचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.



