कमी दरात सोने फसवणूक प्रकरणातील सहाय्यक फौजदार यांना सशर्त जामीन – ॲड शशि कुलकर्णी…

सोलापूर
बाजारभावापेक्षा प्रति तोळा पाच हजार रुपये कमी दराने सोने देण्याचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची सुमारे २८ लाख रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. त्यापैकी सलगर वस्ती पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार ए.एस.न्यामणे यांना अटक करणेत आली होती .
पोलीस कस्टडी संपलेनंतर त्यांनी जामीन मिळणेकामी अर्ज दाखल केला होता.जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने युक्तिवाद केला की,गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून तपास अद्याप सुरू आहे, आरोपींची ओळख परेड होणे बाकी असल्याने जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद केला. याउलट आरोपीचे वकील अँड शशि कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला की,फिर्यादीने कथित व्यवहारानंतर तब्बल चार महिन्यांनी गुन्हा दाखल केल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. सहा. फौजदार अतुल न्यामणे यांच्याविरुद्ध स्वतंत्र स्वरूपाचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे, आरोपी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे तसेच तपासासाठी आवश्यक कारवाई पूर्ण झालेली असून आरोपीला पुढील कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही .
तसेच केवळ ओळख परेड होणे बाकी आहे म्हणून आरोपीस जामीन नाकारता येत नाही. असा युक्तिवाद आरोपीचे वकील अँड शशि कुलकर्णी यांनी न्यायालयासमोर केला. व जामीन मागणीच्या पृष्ठयर्थ त्यांनी जामीनसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा सादर केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, तपासातील कागदपत्रे विचारात घेऊन मा. न्यायालयाने सहाय्यक फौजदार ए.एस.न्यामणे यांना दर सोमवारी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याचे अटीवर व र. रु .५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीनदारांच्या अटीवर नियमित जामीन मंजूर केला.
यात सहाय्यक फौजदार ए.एस.न्यामणे यांचे तर्फे ॲड शशि कुलकर्णी, ॲड प्रणव उपाध्ये ,ॲड प्रसाद अग्निहोत्री , ॲड आदित्य अदोने यांनी काम पाहिले .



