crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई : ६.८० लाख रुपयांचे ३४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त; एक आरोपी अटकेत…

 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर
दि./ ३० जुलै

सोलापूर शहरात अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ६ लाख ८० हजार रुपये किमतीचे ३४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार व पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांनी शहरातील अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक मनोज मोरे व त्यांच्या तपास पथकाने २९ जुलै रोजी शहरात गस्त घालत असताना छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळ, जुना पुणा नाका परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले.

 

 

 

झडतीदरम्यान त्याच्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाची संशयित पावडर आढळून आली. तत्काळ सदर पावडर पोलीस आयुक्तालयातील फॉरेन्सिक पथकाकडून तपासण्यात आली असता ती मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे वजन ३४ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत ६ लाख ८० हजार रुपये आहे.
या प्रकरणी रुपेश प्रदीप थडसरे (वय ३४, रा. घर क्र. ७२, मित्रनगर, शेलगी, सोलापूर) यास अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी सोलापूर शहरात एमडी अमली पदार्थाची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६९५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याचे कलम ८(क), २२(ब) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे हे करीत आहेत.

 

 

कारवाईतील अधिकारी व पथक

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा सहाय्य्क पोलीस निरीक्षज दत्तात्रय कोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, युवराज गायकवाड, सुभाष मुंढे, सोमन सय्यद, रामेश्वर साबळे, धीरज सातपुते, अभिजित पवार, शंकर वाळगी, बाबू काळे आणि मितेश राठोड यांनी सहभाग घेऊन ही उल्लेखनीय कारवाई यशस्वी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button