india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मंत्री भरतशेठ गोगावले यांची उदय कीर्ती एंटरप्राइजेसला विशेष भेट; उदय दादा माने यांच्या शिवसेना प्रवासाला नवे बळ

मोडनिंबच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; जनसंपर्क, सामाजिक कार्य आणि तरुणांवरील प्रभावामुळे मोठ्या पदाची शक्यता

 

HTML img Tag Simply Easy Learning

महाराष्ट्राचे फलोत्पादन, रोजगार हमी व खार जमीन विकास खात्यांचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मोडनिंब येथे सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक उदयदादा माने यांच्या उदय कीर्ती एंटरप्राइजेसला सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे मोडनिंबसह संपूर्ण परिसरात राजकीय चर्चांना मोठी चालना मिळाली असून, उदय दादा माने यांच्या वाढत्या सामाजिक व राजकीय प्रभावाची जोरदार चर्चा रंगली आहे.

 

 

 

उदयदादा माने हे केवळ यशस्वी उद्योजक नसून सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. गोरगरीब कुटुंबांना मदत, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार, उद्योग क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या तरुणांना आर्थिक व मार्गदर्शनाची मदत, तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सातत्याने पाठबळ देण्याचे कार्य त्यांनी आजपर्यंत केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता निर्माण झाली आहे.

 

 

 

मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या या सदिच्छा भेटीनंतर राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची चर्चा वेगाने पुढे येत आहे. उदय दादा माने यांना शिवसेना (शिंदे गट) मध्ये लवकरच मोठा पदभार दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यक्षम, जनसंपर्क असलेले आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व पुढे आणण्याच्या दृष्टीने उदय दादा माने यांचे नाव गांभीर्याने विचाराधीन असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे यांनी माढा तालुक्याचा उत्तरेकडील भाग विकसित व्हावा हा दृष्टिकोन ठेवून संजय बाबांचे कट्टर समर्थक उदय माने यांना शिवसेनेत आणण्याचा त्यांचा सिहांचा वाटा असून भरतशेठ गोगावले यांच्या भेटीनंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. शिवसेना संघटनेत उदय दादा माने यांची भूमिका आगामी काळात अधिक प्रभावी होणार असल्याचे संकेत कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. सामाजिक कार्यातून जनमानसात निर्माण झालेला विश्वास आणि तरुणांमधील त्यांचा वाढता प्रभाव लक्षात घेता, त्यांच्याकडे भविष्यात पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू

या प्रसंगी माझी माढा लोकसभा संपर्कप्रमुख तथा जि.प.सदस्य संजय बाबा कोकाटे, जि.प. सदस्य चरणराज चवरे, आकाश माने, उज्ज्वल माने, साईप्रसाद काळे, प्रवीण भगवा डाळींचे प्रवीण माने, प्रकाश सुरवसे, राहुल गांधी, राहुल केदार, धनाजी लादे, निलेश गिड्डे आकाश दरेकर, विकास देवकुळे, आदित्य माळी, यश झाडे, सचिन चव्हाण, अभिजीत चव्हाण, आशुतोष पवार, शुभम चवरे, माऊली वरवडे, अर्णव शहा, किशोर रणदिवे, यश यादव, सुयश माने, स्वप्नील कणसे, तेजस जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोडनिंब येथील ही भेट केवळ सदिच्छा भेट न ठरता, आगामी राजकीय घडामोडींचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, उदय दादा माने यांच्या नेतृत्वाकडे आता जिल्हाभराचे लक्ष लागले आहे.
-०-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button