crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटल्यात पुराव्याची कडी परिपुर्ण असणे महत्वाचे

सोलापूर न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल

सोलापूर

परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची कडी परिपुर्ण असणे महत्वाचे असते असे मत व्यक्त करुन तब्बल अडीच वर्षापासुन कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले संजयसिंह रतनसिंह व त्यांची पत्नी नितु संजयसिंह यांची सोलापूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

 

 

 

कोण्हेरी ता. मोहोळ येथील हॉटेलमध्ये संजयसिंह रतनसिंह व त्यांची पत्नी कामास होते. त्याच हॉटेलमध्ये कामास आलेल्या उत्तर प्रदेशमधीलच संतोषसिंग याच्याबरोबर भांडण झाल्याने पती पत्नींनी दि. २०/०३/२०२४ रोजी संतोषसिंग याचा नॉयलॉन दोरीने गळा आवळुन खुन केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.

 

 

 

आरोपी विरुध्द सादर करण्यात आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्याची कडी परिपुर्ण नाही व अशा खटल्यातील घटना शाबितीबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयाने शरद सारडा वि. महाराष्ट्र सरकार या खटल्यातील निकाल पत्रात नमुद केलेल्या पंचशिल तत्वाच्या निकषात बसत नाही असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला होता.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. प्रणित जाधव, यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button