india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

राजमाता अहिल्यादेवी होळकर ( लेडी डफरीन ) हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी

सोलापूर

 

राजमाता अहिल्यादेवी होळकर ( लेडी डफरीन) हॉस्पिटल येथे जनरल सोनोग्राफी सेवा नियमितपणे सुरू करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक सीए. विनोद धर्मा भोसले व भाजपा मंडल अध्यक्ष नागेश खरात यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे व महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांच्याकडे संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या या हॉस्पिटलमध्ये फक्त गरोदर महिला यांच्या करिता सोनोग्राफी सुविधा उपलब्ध आहे परंतु इतर नागरिकांना जनरल सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन मोठा आर्थिक खर्च करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता, रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने ही सेवा सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे भोसले व खरात यांनी सांगितले आहे.

 

तसेच, आवश्यक डॉक्टर, तंत्रज्ञ व इतर सुविधा उपलब्ध करून देत जनरल सोनोग्राफी सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, जेणेकरून परिसरातील नागरिकांना त्यांच्या भागातच दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा मिळू शकेल, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

 


यावेळी मा आयुक्त सचिनजी ओंबासे व आरोग्य अधिकारी यांनी या मागणीला सकरात्मक प्रतिसाद दिला आहे व लवकरच ही सुविधा सुरू करण्याची ग्वाही यांनी दिली.
महानगरपालिकेने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना सोबत शाहू महाराज सलगर, श्रीकांत गायकवाड, दिनेश जाधव, चंद्रकांत पात्रे, सौरभ साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button