सलग 08 दिवस सातत्यपूर्ण तपास, आणि रात्रीच्या वेळी सोनसाखळी चोरणारे आरोपी जेरबंद ! गुन्हे शाखेचा एक वेगळा तपास अनुभव….

सुमारे 200 किलोमीटर 168 सीसीटीव्हींची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण
सोलापूर
येथील जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी सोनसाखळी चोरी झाल्यानंतर व घटनास्थळी कुठे CCTV फुटेज मिळत नसल्याने आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून तपास करणे गरजेचे होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथकातील इमरान जमादार यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील असलेले सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण करून सदरचा गुन्हा हा कोणत्या संशयित आरोपींनी केला आहे, हे अचूकपणे शोधून काढले.
त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर पथकातील इमरान जमादार, उमेश पवार, विनोद रजपूत, रामा भिंगारे आणि सुरज पवार या पथकाने सुमारे 200 किलोमीटर दूर जात, आरोपीच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील 168 CCTV कॅमेरांची सलग 08 दिवस सातत्यपूर्ण पडताळणी करून, त्याअनुषंगाने तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर गोपनीय माहिती काढून आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली सोन्याची चैन, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण 2,75,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
एवढ्या दूरपर्यंत CCTV कॅमेरे पडताळणी करून गुन्हे शाखेस तपासाचा एक वेगळा अनुभव आला.



