crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

वैभव वाघे खून खटला ! अजित गायकवाडचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला:-विशेष सरकारी वकील अँड. संतोष वि. न्हावकर

सोलापूर

 

 

सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पिडीत महिला, रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड वगैरे ९ आरोपींविरुद्ध सदर बझार पोलीस स्टेशनने वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.त्यापैकी अजित ईश्वर गायकवाड याचा दुसऱ्यांदा दाखल केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. रेड्डी सो यांनी फेटाळला.

 

 

 

 

यात हकिकत अशी कि, दि.१/१/२५ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिध्दार्थ हौसिंग सोसायटीतील रिंकि शिवशरण, अदित्य दावणे, पुथ्वीराज शिरसे व रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहारजवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबलेले होते. त्यावेळी सनी निकंबे हा दारु पिऊन पिडीत महिलेच्या अंगावर आला, त्यावेळी ऋतूज गायकवाड व रिकी शिवशरण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड याने आवाज देऊन “गाडीतील रॉड काढून घेऊन या, या लोकांना माज आलेला आहे, कुठले भिकारडे येथे आलेले आहेत”, असे ओरडून शिविगाळी करून त्यांना बोलावून घेतले. सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पिडीत महिला व नेत्र साक्षीदार यांना मारहाण केली, त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली व त्यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असता समरसेनजीत उर्फ टिपू गायकवाड याने त्याला अडवून पाडले व रस्त्यावरून फारशी उचलून वैभव वाघेच्या डोक्यात घातली. त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड सह सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व लाकडी दंडुकाचे सहाय्याने त्याचे सर्वांगावर मारहाण केली. प्रमोद गायकवाड याने लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड व डोक्यात मारले, प्रसेनजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांनी लोखंडी रॉडने त्याचे हाता पायावर, डोक्यावर, पाठीवर, व शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली. अजित गायकवाड व किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने, लोखंडी रॉडने मारहाण केली. प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे यास सोडविण्यास कोणीही पुढे आले नाही तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले. वैभव वाघे यास सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केल्यानंतर दि. ०६/०१/२०२५ रोजी तो मरण पावला.

 

 

 

 

यामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अँड. संतोष वि. न्हावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीने लोखंडी रॉडने व लाकडी बांबूने मयत वैभव याच्या डोक्यात, पायावर, तोंडावर मारहाण केली व सर्व आरोपींनी संगनमत करून खून केला असल्याचा स्वकृतदर्शनी ठोस पुरावा असल्याचे तसेच दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल करणेस परिस्थितीत कोणताच बदल झालेला नसल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले व त्या पुष्ट्यर्थ मे. उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल केले सदरचा युक्तिवाद ग्राह्य़ मानून न्यायालयाने अजित ईश्वर गायकवाड याचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा नामंजूर केला.

 

 

 

यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अँड. संतोष वि. न्हावकर तर आरोपीतर्फे अँड. सोमनिग पुजारी यांनी काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button