india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

श्री सोलापूर शहर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मध्यवर्ती महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन

महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते शिवानुभव मंगल कार्यालय येथे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

 

सोलापूर

 

शिवानुभव मंगल कार्यालय येथे श्री सोलापूर शहर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मध्यवर्ती महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन आज सोलापूरचे महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

श्री सोलापूर शहर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील गणेशोत्सव मंडळांना एकत्रित आणून गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, सामाजिक आणि विधायक पद्धतीने साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या कार्याला अधिक संघटनात्मक बळ मिळावे आणि मंडळांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व समन्वय साधता यावा, यासाठी मध्यवर्ती महामंडळ कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

 

या उद्घाटन सोहळ्यास पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते, ट्रस्टी अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, उत्सव अध्यक्ष प्रभाकर भाऊ रोडगे, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुनील रसाळे, श्री. अंबादास गुत्तीकोंडा, लता फुटाणे, दिलीप पतंगे, संजय शिंदे, हेमा चिंचोळकर, बाळासाहेब गायकवाड, अनिल गवळी, विजय पुकाळे, गौरीशंकर जक्कापुरे, अशोक कलशेट्टी, सुनील शरणार्थी यांच्यासह श्री सोलापूर शहर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी श्री सोलापूर शहर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा उत्सव म्हणून साजरा व्हावा, यासाठी मंडळांकडून राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे महापौरांनी सांगितले.

सोलापूर शहरातील गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहनही महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी केले.

मध्यवर्ती महामंडळ कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये अधिक चांगला समन्वय निर्माण होऊन गणेशोत्सवाचे नियोजन, मंडळांच्या अडचणी तसेच विविध सामाजिक उपक्रमांसंदर्भात प्रभावीपणे कार्य करता येणार आहे. त्यामुळे हे कार्यालय गणेशोत्सव मंडळांसाठी मार्गदर्शन व समन्वयाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button