आमदार देवेंद्र कोठेंच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग २२ मध्ये २९.३९ लाखांच्या रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ

सोलापूर :
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार युवा आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक २२ मधील लिमयेवाडी येथे २९ लाख ३९ हजार १५० रुपयांच्या अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये हे काम करण्यात येत आहे .

यावेळी प्रभाग क्रमांक २२ चे भाजपा नगरसेवक किसन भाऊ जाधव यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, त्यांच्या सहकार्यातून प्रभाग २२ मधील विकासकामांना मोठी गती मिळत असल्याचे सांगितले. आमदार देवेंद्रदादांच्या वाढदिवसानिमित्त आजच्या रस्ता विकासकामाचा शुभारंभ हा नागरिकांसाठी विकासाची भेट ठरत आहे, असे त्यांनी नमूद केले. राज्याचे कर्तव्यदक्ष व विकासाभिमुख मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री जयकुमार गोरे, पाणीदार आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्यातून सोलापूरच्या विकासकामांना गती मिळत आहे. अल्पावधीत आमदार कोठे यांनी शहराच्या विकासासाठी ठोस पावले उचलली असून, प्रभाग २२ मध्येही मूलभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका सौ. चैत्रालीताई गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, युवा नेते चेतन नागेश अण्णा गायकवाड, श्रीमती लक्ष्मी नडगिरी, राजू जगन्नाथ जाधव, दयानंद जाधव, लक्ष्मीताई आठवले, राधिका खांबसकर, दिपाली हटकर,भागाताई उपाळे, मंगलाताई एकमले, नूरजहाँ पटेल, शशिकला जाधव, रवींद्र जाधव, बालाजी जाधव, ज्ञानेश्वर माऊली जाधव, सागर एकमल्ले, शकुंतला जाधव, नीलाताई गायकवाड, सरस्वती जाधव, अश्विनी एकमले, गंगाताई उघडे, कोमल उपाळे, ज्योती एकमले, गजानन जाधव, अनुप उपाळे, राज गाडगे, सुजल गायकवाड, श्रीराम कसबे, समर्थ गायकवाड, रवी जाधव, अभिषेक राठोड, ऋषिकेश गायकवाड, सुरेश उपाळे, रामचंद्र जाधव, श्याम जाधव, मेहबूब शेख, रवींद्र जाधव, अंबादास गायकवाड, गौतम फडतरे, संजय कांबळे, ज्ञानेश्वर गायकवाड, कल्पेश गायकवाड आदी उपस्थित होते.



