वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील दोन इसमांना १ वर्षासाठी सोलापूर शहर व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून तडीपार

वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील अकबर जिलानी कुरेशी व गौस अमीन कुरेशी (दोघे रा. वळसंग) यांना विविध गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी १ वर्षासाठी सोलापूर शहर व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री. विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट विभाग राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तडीपारीचा प्रस्ताव प्रभारी अधिकारी, वळसंग पोलीस ठाणे राहुल डोंगरे यांनी सादर केला होता.
आज दि. 12/09/2026 रोजी तडीपारी आदेशाची अंमलबजावणी करून दोन्ही इसमांना सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सोडण्यात आले.र कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अनिस शेख तसेच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विपिन सुरवसे, रामदास मालचे, पोलीस नाईक मल्लिनाथ बंदीछोडे, रवि शिवशिंगवाले व प्रसाद मांढरे यांनी सहभाग घेतला.
_वळसंग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण



