धूत मेगा साडी महोत्सवातून होणार साडी खरेदीचा धमाका
सणांच्या पार्श्वभूमीवर वाजवी दरात साड्या खरेदीची सुवर्णसंधी : शनिवारी उदघाटन

सोलापूर : प्रतिनिधी
तब्बल ६० वर्षांची साडी विक्रीची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या धूत साडीच्या धूत मेगा साडी महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी ११ रोजी सकाळी ११ वाजता बाळीवेस येथील धूत साडी सेंटरमध्ये होणार आहे, अशी माहिती धूत सारिजचे पुरुषोत्तम धूत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

धूत मेगा साडी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सायली गोरे आणि खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी धाराशिव जिल्ह्याच्या शिवसेना उपजिल्हाध्यक्ष उषा गायकवाड, आमदार देवेंद्र कोठे यांच्या सुविद्य पत्नी मोनिका कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांच्या सुविद्य पत्नी धनश्री कोंड्याल, डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या सुविद्य पत्नी श्रुती कोठे, भारतीय जनता पार्टीच्या शहर सरचिटणीस सुधा अल्लीमोरे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भारतीय जैन संघटनेच्या उपाध्यक्षा कांचनमाला संगवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कोणताही सेल, डिस्काउंट नसलेला परंतु वाजवी दरात अत्यंत नामांकित ब्रँडेड साड्यांचा खजिना धूत सारिजकडून महिलांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आगामी काळात लग्नसराई, मुंज, साखरपुडा, वास्तुशांती, नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन तसेच श्रावण महिन्यापासून सुरुवात होणारे अनेक सण समारंभ असणार आहेत. सण उत्सवांच्या काळात महिला भगिनी दरवर्षी येणाऱ्या धूत सारीजच्या साडी महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.
यंदाच्यावर्षी धूत सारिजकडून सिल्क साड्या, घागरा, ओढणी यांच्या असंख्य व्हरायटी धूत मेगा साडी महोत्सवात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या विविध प्रांतातल्या आकर्षक साड्या खरेदी करण्याची संधी या निमित्ताने महिला भगिनींना मिळणार आहे.
धूत मेगा साडी महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात विविध राज्यातील जगप्रसिद्ध साड्या उत्पादन करणाऱ्या साडी कारखानदारांनी त्यांचा माल अत्यंत कमी दरात थेट धूत सारिजसाठी खुला करून दिला आहे. साहजिकच थेट साडी कारखान्यातून सोलापुरात साड्या उपलब्ध झाल्यामुळे त्या ग्राहकांना अत्यंत ब्रँडेड असूनही कमी दरात मिळणार आहेत.
याशिवाय घरगुती साडी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही धूत मेगा साडी महोत्सवात साड्या खरेदी केल्याचा मोठा फायदा होणार आहे. सोलापूर शहर जिल्ह्यासह परिसरातील महिला भगिनींनी धूत मेगा साडी महोत्सवास आवर्जून भेट द्यावी आणि साड्या खरेदीचा भरपूर आनंद लुटावा, असे आवाहन धूत सारिजचे पुरुषोत्तम धूत यांनी याप्रसंगी केले.
या पत्रकार परिषदेस नंदकिशोर धूत, पुरुषोत्तम धूत, राजगोपाल धूत, चंदन धूत, आदित्य दायमा, अशोक जंगम, नटवर दायमा आदी उपस्थित होते.



