स्थानिक गुन्हे शाखेकडून जबरी चोरी , घरफोड्या, मोटार सायकल चोरी असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणुन 3,29,750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…

दिनांक 09/07/2026
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये मालाविषयी गुन्हयांची उकल करणेकामी व रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास मालाविषयी गुन्हयांची उकल व पाहिजे फरारी आरोपी जेरबंद करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मालाविषयी गुन्हयाची उकल करणेकामी व फरारी आरोपींचा शोध घेणेकामी मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीत हजर असताना पथकातील पोलीस अंमलदार अक्षय डोंगरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, मोका मधुन जामीनावर सुटलेला आरोपी नामे सागर सफाल्या शिंदे व त्याचा सावत्र भाउ व त्याचा आणखीण एक साथीदार असे तीघांनी मिळुन मनगोळी ता दक्षिण सोलापूर येथील वस्तीवरील वयोवृध्द महिलेस जिवे मारण्याची धमकी देवुन तीचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरले असुन ते दोघे सध्या अंत्रोळी फाटा येथे चोरीच्या मोटार सायकलसह थांबलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना कळविले असता, त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मंद्रुप येथुन निघुन बातमी प्रमाणे मौजे अंत्रोळी फाटा ता दक्षिण सोलापूर येथे आले असता, तेथे बातमी प्रमाणे दोन इसम हे मोटार सायकलसह थांबलेले दिसुन आलेे, त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारता ते उडवाउडवीचे उत्तरे देवू लागले, त्याना सपोनि ज्ञानदेव वाघ यांनी विश्वासात घेवून पोलीस असल्याचे सांगून त्याचे नांव व पत्ता विचारता त्यानी त्यांची नांवे 1) सागर उर्फसाग-या सफ-या उर्फ सफाल्या शिंदे वय 29 वर्षे व त्याचा सावत्र भाऊ असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक दोघे रा जामगाव ता मोहोळ असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे मिळालेल्या बातमीप्रमाणे कौशल्यपूर्ण तपास करता, त्यानी मागील 15 ते 20 दिवसापूर्वी मनगोळी शिवारातील एका वस्तीवरील वयोवृध्द महिलेस जीवे मारण्याची धमकी देवुन तिचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरले असल्याचे सांगितले पकडलेले आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी दामाजी कारखाना रोड मंगळवेढा येथे घरातील महिलेस व मुलास धाक दाखवुन लुटल्याचे सांगुन कंदलगाव ता दक्षिण सोलापूर, हराळवाडी ता मोहोळ येथे एकाच रात्री 05 घरे फोडल्याचे सांगुन त्यांचे ताब्यात मिळुन आलेली युनीकार्न मोटार सायकल हि शिवाजी नगर बाळे येथुन चोरुन आणल्याचे सांगितले त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 16.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 15 ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने, एक युनीकॉर्न मोटार सायकलसह व रोख रक्कम असा एकुण 3,29,750/- रु बाजारमुल्य भावाप्रमाणे किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेकडे अधिक तपास चालु असुन आणखीण गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पकडलेला विधीसंघर्षग्रस्त बालक हा एकुण 16 विविध घरफोडीच्या गुन्हयात रेकॉर्डवरील पाहिजे असुन सागर शिंदे हा कामती पोस्टे गुरनं 66/2024 भादवि कलम 326 तसेच मंद्रुप पोस्टे 268/2018 भादवि कलम 379 मध्ये पाहिजे असलेला आरोपी आहे. मोहोळ पोस्टे कडील गुरनं 132/2018 भादवि कलम 302 मध्ये नॉन बेलेबल वॉरंट प्रलंबीत आहे. तो सध्या मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी या गावातील सन 2018 मधील खुनासह दरोडयातील मोका मधुन जामीनावर सुटलेला आरोपी आहे.
त्यांच्याकडुन उघडकीस आलेल्या गुन्हयांची माहिती खालीलप्रमाणे,
अ.क्र. पोलीस ठाणे गुरनं व कलम
1 मंद्रुप पोलीस ठाणे 245/2026 बीएनएस 309(6), 324(4), 3(5)
2 मंगळवेढा पोलीस ठाणे 168/2026 बीएनएस 309(4), 3(5)
3 मंद्रुप पोलीस ठाणे 252/2026 बीएनएस 331(4), 305(अ), 3(5)
4 कामती पोलीस ठाणे 147/2026 बीएनएस 331(4), 305(अ), 3(5)
5 फौजदार चावडी पोलीस ठाणे 425/2026 बीएनएस 303(2)
ही कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ/ नागेश कोणदे, मोहन मनसावाले, जगदीश राठोड पोलीस अंमलदार दिनेश पवार, अक्षय डोंगरे, ज्ञानेश्वर पाथरुट, सतिष बुरकुल, महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे, सुनंदा झळके यांचे पथकाने कामगिरी बजावली आहे….



