एमआयडीसी पोलिसांची कारवाई : डबल मर्डर प्रकरणातील चोरीचा उलगडा; तिसरा आरोपी अटकेत, ₹२२.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त.

सोलापूर
एमआयडीसी पोलीस ठाण्याने दुबळ मर्डर प्रकरणाशी संबंधित चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत तिसऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून ₹२२ लाख ७४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी मृत महादेव पांडुरंग मंचाळ व रंगम्मा महादेव मंचाळ (रा. प्लॉट क्र. २३, कृष्णा नगर, कुमठा नाका, स्वागत नगर रोड, सोलापूर) यांच्या हत्येनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राहुल रामचंद्र मंचाळ (वय २८) व विकास रामचंद्र मंचाळ (वय २३) यांना अटक केली होती. चौकशीत आरोपी विकास याने चोरीतील सोन्याचे दागिने आपला मित्र साहिल दादा शेख (रा. इंदापूर, जि. पुणे) याच्याकडे दिल्याची माहिती समोर आली.
गोपनीय माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी मुंबई येथे जाऊन साहिल शेख याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीतील दागिने विकल्याची कबुली दिल्यानंतर अंधेरी (मुंबई) येथे कारवाई करून त्याच्याकडून १ तोळा सोने, ₹१०.७४ लाख रोख रक्कम, एक कार, दोन मोबाईल फोन तसेच बँक खात्यातील ₹८ लाख रक्कम गोठवून असा एकूण ₹२२.७४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रितम गावकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश विरगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगीता पाटील (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, एकनाथ उबाळे, मंगेश गायकवाड, सचिन मांगे, आतिफसद्दीन शेख, संदीप जावळे, सुहास अर्जुन, प्रफुल्ल जाधव, मनोज पचांगे, कुमार बोली, अमरसिंग शिवलिंगप्पावाले, आदिनाथ डिंगोळे तसेच संपूर्ण गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोलाची कामगिरी बजावली.
एमआयडीसी पोलिसांच्या या कारवाईमुळे दुहेरी हत्येनंतर झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा होऊन चोरीतील मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे….