crimemaharashtrapoliticalsocialsolapur

शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी ! राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या ३ सराईत आरोपींना अटक; ₹४ लाख ३५ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त….

 

सोलापूर

शहर गुन्हे शाखेने राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक करत अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला आहे. आरोपींकडून २७ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या, क्रेटा कारची चावी, ऑटो रिक्षा, मोबाईल फोन, चाकू, मिरची पावडर असा एकूण ₹४,३५,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

 

दि. २ जुलै २०२६ रोजी फिर्यादी व त्यांचा मित्र कर्नाटकातील कार्यक्रम आटोपून क्रेटा कारने प्रवास करत असताना विजयपूर रोडवरील एका हॉटेलजवळ अज्ञात आरोपींनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राच्या डोळ्यात तिखट टाकून मारहाण केली आणि त्यांच्या हातातील ३ सोन्याच्या अंगठ्या तसेच क्रेटा कारची चावी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी विजयपूर नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

 

पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे :

शिवाजी उर्फ मरक्या मोहन जाधव (वय २४)

महादेव उर्फ मंध्या मोहन जाधव (वय २५)

अमित उर्फ इंडिया हरीशचंद्र पवार (वय ३२)

हे तिघेही प्रतापनगर तांडा, विजयपूर रोड, सोलापूर येथील रहिवासी आहेत.चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी शिवाजी उर्फ मरक्या मोहन जाधव याच्यावर यापूर्वीही विजयपूर नाका व मंडूप पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली असून, इतर दोन आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही पडताळणी सुरू आहे.

 

 

 

ही कारवाई पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये,पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा अश्विनी पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार , यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव तसेच गुन्हे शाखेच्या तपास पथकातील पोलिस अंमलदार अंकुश भोसले , जावेद जमादार, शैलेश बुगुड, राजकुमार वाघमारे , वसीम शेख ,अभिजित धायगुडे , काशिनाथ वाघे , आबा सावळे, धीरज सातपुते , अजिंक्य माने , विठ्ठल यलमार, वाहन चालक सतीश काटे , बाळू काळे, सायबर पोलिस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button