entertainmentindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

तुंबाडची मंजुळा’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; अवघ्या दोन आठवड्यांत १५ कोटींचा टप्पा पार

सोलापूर / प्रतिनिधी

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा असून प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाची नवी शिखरे गाठत आहे. झी स्टुडिओजची निर्मिती आणि विविध कोरगांवकर यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत १५ कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार करत ब्लॉकबस्टर यश संपादन केले आहे.
उत्कंठावर्धक आणि विनोदी कथानक, कर्णमधुर संगीत, कोकणातील निसर्गरम्य लोकेशन्स तसेच संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल असे दर्जेदार मनोरंजन यामुळे ‘तुंबाडची मंजुळा’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलचे फलक झळकत असून समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला भरभरून दाद मिळत आहे. सोशल मीडियावर सामान्य प्रेक्षकांपासून ते इन्फ्लुएन्सर्सपर्यंत सर्वत्र या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.

 

चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी सध्या चित्रपटाची टीम विविध शहरांतील चित्रपटगृहांना भेटी देत आहे. यावेळी प्रेक्षकांनी “खूप दिवसांनी मनमुराद हसलो”, “संपूर्ण कुटुंबासह पाहण्यासारखा चित्रपट”, “उत्तम सामाजिक संदेश देणारी कथा” अशा शब्दांत चित्रपटाचे कौतुक केले. विशेष म्हणजे अनेक प्रेक्षक हा चित्रपट दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही पाहण्यासाठी चित्रपटगृहात येत असल्याचे दिसून आले.
या यशाबाबत झी स्टुडिओज मराठीचे व्यवसायप्रमुख तथा निर्माते बवेश जानवलेकर यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “२०२६ हे वर्ष झी स्टुडिओजसाठी अत्यंत यशस्वी ठरत आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई’ आणि ‘सुपर डुपर’ या चित्रपटांनंतर ‘तुंबाडची मंजुळा’लाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.

 

 

 

हा चित्रपट केवळ कमाईपुरता मर्यादित नसून समाजातील महिलांवरील अत्याचारासारख्या गंभीर विषयाला चर्चेत आणण्याचे कामही करत आहे. प्रेक्षक चित्रपट पाहताना मनमुराद हसतात, पण त्याचवेळी विचार करायलाही भाग पडतात, हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे.”

 

जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अंशुमन विचारे, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी यांच्यासह योगेश शिरसाट, शार्दुल सराफ, उमेश जगताप, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, अथर्व रुके, प्रियल नाईक आणि वर्षा दांदळे यांच्या प्रभावी अभिनयाने सजलेला ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट सध्या महाराष्ट्रभर यशस्वीपणे प्रदर्शित होत असून सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन अनुभवावा, असे आवाहन चित्रपटाच्या टीमकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia