india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

खासदारांचा दशपिंडविधी करणाऱ्यांवर मनिष काळजे यांची टीका..

सोलापूर

 

शिवसेनेच्या सहा खासदारांचा दशपिंडविधी करून आंदोलन करणाऱ्यांवर शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी जोरदार टीका केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात काळजे यांनी म्हटले आहे की, आंदोलन करणाऱ्यांनी सहा खासदारांचा नव्हे तर माजी खासदार संजय राऊत यांचाच दहावा-अकरावा घालावा आणि त्या विधीसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांना निमंत्रित करावे.त्यासाठी चा सर्व खर्च आम्ही शिवसैनिक करू…

 

काळजे म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून कार्य करणाऱ्या आणि गांधी परिवारासमोर कधीही न झुकलेल्या खऱ्या शिवसेनेच्या पाठीशी हे सहा खासदार आणि लाखो शिवसैनिक ठामपणे उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात अशा प्रकारचे आंदोलन करणे हे शिवसैनिकांच्या भावनांचा अपमान करणारे आहे.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेससोबत हातमिळवणी करून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी निष्ठेच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांनी इतरांना निष्ठा शिकवू नये. शिवसेनेच्या नावावर राजकारण करणाऱ्या काही लोकांनी अशा प्रकारचे वेडे चाळे बंद करावेत, असा इशाराही त्यांनी दिला.

 

 

शिवसेनेच्या विचारांशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेशी एकनिष्ठ राहणारे शिवसैनिक आजही पक्षप्रमुखांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यरत असल्याचे काळजे यांनी नमूद केले. तसेच अशा आंदोलनांमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी शिवसैनिक त्याला बळी पडणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia