crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

विजापूर : बनावट गोळीबार प्रकरणाचा पर्दाफाश; तिघांना अटक

 

विजयपूर

 

विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 3 जून रोजी नोंद झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचे वळण आले असून, फिर्यादीनेच बनावट गुन्हा रचल्याचे उघड झाले आहे.
इट्टंगीहाळ दोड्डी येथील रहिवासी दयवंत डेरे याने आपल्या शेतात काम करत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार करून जखमी केल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती करून चौकशी सुरू केली. तपासादरम्यान आनंद उर्फ अनिल डेरी आणि कोंडीबा मानवर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता, धक्कादायक सत्य समोर आले.

 

 

 

पोलिसांच्या माहितीनुसार, दयवंत डेरे आणि इतर आरोपींचे गावातील काही व्यक्तींशी जुने वैमनस्य होते. त्या व्यक्तींना गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने 3 जून रोजी जालगेरी गावाजवळील शेतात तिघांनी कट रचला. त्यावेळी आनंद डेरी याने स्वतःजवळील देशी पिस्तुलातून दयवंतच्या उजव्या हाताजवळ गोळी झाडून त्याला जखमी केले, असे तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर दयवंत डेरे याने तोरवी गावाजवळ आपल्या विरोधकांनीच त्याच्यावर गोळीबार केल्याचा बनाव रचून पोलिसांकडे खोटी तक्रार दाखल केली होती, असेही तपासात समोर आले.

 

 

या प्रकरणात फिर्यादी दयवंत डेरे, आनंद उर्फ अनिल डेरी आणि कोंडीबा मानवर या तिघांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले देशी पिस्तूल जप्त करण्यात आले असून, आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia